शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दवाखान्यातील घातक जैविक कचरा रस्त्यावर फेकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:44 IST

दवाखान्यातील जैविक कचरा हा घातक असल्याने त्याची विल्हेवाट लावण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली असताना हा कचरा शाळेजवळ, उद्यानाशेजारी फेकण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कचरा टाकणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सातपूर : दवाखान्यातील जैविक कचरा हा घातक असल्याने त्याची विल्हेवाट लावण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली असताना हा कचरा शाळेजवळ, उद्यानाशेजारी फेकण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कचरा टाकणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.सातपूर परिसरातील डॉक्टरांबरोबर शासनाच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने सातपूर, त्र्यंबकेश्वर मुख्य रस्त्याच्या कडेला हा जैविक कचरा फेकण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यालगत लहान मुलांसाठी खेळण्याचे उद्यान व शाळा आहे. जैविक कचºयामुळे कावीळ, क्षयरोग यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. मात्र यासंदर्भात आवश्यक त्या प्रमाणात जनजागृती केली जात नाही. सातपूर परिसरात लहान-मोठे रुग्णालये आहेत. या दवाखान्यात निर्माण होणारा जैविक कचरा सर्रास उघड्यावर टाकला जात आहे.त्र्यंबकेश्वर रस्त्यावर टाकण्यात आलेल्या या जैविक कचºयात सलाइन, सिरिंज, नळ्या, इंजेक्शनसह विविध औषधी गोळ्यांचा समावेश होता. या कचºयाची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा शासनाचा आदेश असताना मात्र हा कचरा उघड्यावर फेकून दिल्याने आश्चर्य व्यक्तहोत आहे. परिसरातील विद्यार्थी कुतुहलाने या कचºयातून इंजेक्शन, सलाइन नळ्या उचलतात.४जैविक कचºयाचे व्यवस्थापन डॉक्टरांकडून केले जात नसल्याने व वैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळेच सर्रास हा कचरा फेकून दिला जातो. दरम्यान, मनपा आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. कुठल्या रुग्णालयाने कचरा टाकला याचा तपास करून कारवाई करणार असल्याचे विभागीय स्वच्छता निरीक्षक माधुरी तांबे यांनी सांगितले.

टॅग्स :environmentवातावरणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका