शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अद्याप धागेदोरे हाती लागले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:41 IST

भरवस्तीत शहराच्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या कुलकर्णी गार्डनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुलकर्णी कॉलनीतील गजानन स्मृती अपार्टमेंटच्या वाहनतळात येऊन हल्लेखोरांनी एअर गनद्वारे गोळीबार करत तीन लाखांची लूट केल्याची घटना शनिवारी (दि.३०) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली होती.

नाशिक : भरवस्तीत शहराच्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या कुलकर्णी गार्डनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुलकर्णी कॉलनीतील गजानन स्मृती अपार्टमेंटच्या वाहनतळात येऊन हल्लेखोरांनी एअर गनद्वारे गोळीबार करत तीन लाखांची लूट केल्याची घटना शनिवारी (दि.३०) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांच्या हाती धागेदोरे लागलेले नसून पोलीस मागील २४ तासांपासून शोध घेत आहेत.साधूवासवानी रस्त्यावरील गजानन स्मृती अपार्टमेंटच्या आठव्या क्रमांकाच्या सदनिकेत राहणारे विराग चंद्रकांत शाह (३८) हे गोळे कॉलनीमधील त्यांच्या पूनम एंटरप्रायजेस या होलसेल वैद्यकीय साहित्य विक्रीचे दुकान आटोपून दुचाकीवरून घरी आले. यावेळी त्यांचा पाठलाग करत एका स्पोर्टस बाइकवरून तिघे युवक अपार्टमेंटच्या वाहनतळापर्यंत आले. तिघांपैकी एकाने त्यांच्या दिशेने पिस्तूल (एअर गन) रोखून फायर केले. यामुळे शाह घाबरून वाहनतळातून जिन्याकडे पळताना जमिनीवर पडले. त्यांच्या हातातून दोघा हल्लेखोरांनी रोकड असलेली बॅग हिसकावून तत्काळ दुचाकीवरून पळ काढला. या घटनेला २४ तासांपेक्षा अधिक वेळ उलटला असून, अद्याप हल्लेखोरांचा सुगावा लागलेला नाही.हल्लेखोरांच्या शोधार्थ सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या पथकांसह गुन्हे शाखेचे पोलिसांचे पथकही मागावर आहेत; मात्र अद्याप कुठल्याही पथकाला अशाप्रकारे जबरी लूट करणाऱ्या संशयितांविषयीची खात्रीशीर माहिती व धागेदोरे मिळून आलेले नाही. शहरासह जिल्ह्यात तसे जिल्ह्याबाहेरदेखील या हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत.मध्यरात्रीपर्यंत ‘मिशन’, दिवसभर चाचपणीशनिवारी रात्री ८ वाजता घटना घडताच सर्वत्र सतर्कतेचे आदेश दिले गेले तसेच मध्यरात्री उशिरापर्यंत शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीती नाकाबंदी व मिशन आॅल आउट राबविण्यात आले. तसेच रविवारी दिवसभर सरकारवाडा पोलिसांकडून गंगापूररोड, साधूवासवानी रस्त्यावरील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासण्यात आले. तसेच सराईत संशयित गुन्हेगारांची चौकशी पोलिसांकडून याप्रकरणी केली गेली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस