शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनच्या काळात मिळाले हजारो मजुरांना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 01:28 IST

नाशिक : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी सुरू असल्याने ग्रामीण भागातील मजुरांची उपासमार टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेचे कामे सुरू केली असून, त्यामुळे मजुरांच्या हाताला काम तर मिळालेच, परंतु त्यांना मान्सूनपूर्व हंगामात स्वत:च्या शेतात शेतीकामे करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

नाशिक : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी सुरू असल्याने ग्रामीण भागातील मजुरांची उपासमार टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेचे कामे सुरू केली असून, त्यामुळे मजुरांच्या हाताला काम तर मिळालेच, परंतु त्यांना मान्सूनपूर्व हंगामात स्वत:च्या शेतात शेतीकामे करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. लॉकडाउनच्या काळात गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे अडीच हजार कामे सुरू करून साडेअकरा हजारांहून अधिक मजुरांना यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून शहरी भागात रोजगारासाठी स्थलांतरित केलेल्या मजुरांची संख्या हजारोच्या आसपास असून, आजवर या मजुरांनी शहरातील बांधकाम क्षेत्रात कामे करून आपला उदरनिर्वाह केला. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउन व संचारबंदी जारी केल्याने शहरी भागात वास्तव्यास असलेल्या ग्रामीण भागातील मजुरांवर उपासमारीची वेळ आली त्यामुळे त्यांनी पुन्हा आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. परंतु गावी जाऊनही त्यांच्या हाताला काम मिळण्याची शाश्वती राहिलेली नाही. मुळात लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला पाहिजे त्याप्रमाणात भाव मिळत नाही, त्याचबरोबर मजुरांना रोजगार देण्यासाठीही पैसे नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातील उभी पिकांमध्ये जनावरे सोडून दिली आहेत. अशा परिस्थितीत गावाकडे पोट भरण्यासाठी गेलेल्या मजुरांवर दुहेरी संकट कोसळले असल्याचे पाहून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत अशा मजुरांना त्यांच्या गावातच हाताला काम देण्याची योजना आखली आहे. या संदर्भात सर्वच ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या असून, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सार्वजनिक विकास कामे सुरू करण्याबाबत घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी अशा मजुरांना त्यांच्या शेतातच किंबहुना अन्य शेतकºयांकडे रोहयोंतर्गत शेतीचे कामे करण्याची मुभा देण्यात आली आहे.जिल्ह्यातील ६७९ ग्रामपंचायतींनी याकामी पुढाकार घेतला असून, गेल्या पंधरा दिवसांत रोजगार हमी योजनेची २,४८९ कामे सुरू करण्यात आली आहे. या कामांवर जवळपास साडेअकरा हजार मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. येत्या आठवड्यात मजुरांची ही संख्या पंधरा हजारांहून अधिक होण्याची शक्यता लिना बनसोड यांनी बोलून दाखविली आहे. वाढलेले लॉकडाउन व मजुरांची उपासमार टाळण्यासाठी जिल्ह्यात ६२ हजार कामे सेल्फवर ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी