शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हजारोंच्या आॅर्डर देऊन  नंतर करायच्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:35 IST

ऐन सणासुदीत आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून उभे राहिलेले संकट थोपवण्यासाठी आता राज्यातील अनेक भागांतील व्यापाऱ्यांनी अभिनव आंदोलन सुरू केले असून, त्यानुसार आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून शेकडो आॅडर्स नोंदवायच्या आणि कॅश आॅन डिलेव्हरीच्या वेळीच त्या रद्द करण्याचा प्रकार सुरू करण्यात आला आहे.

नाशिक : ऐन सणासुदीत आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून उभे राहिलेले संकट थोपवण्यासाठी आता राज्यातील अनेक भागांतील व्यापाऱ्यांनी अभिनव आंदोलन सुरू केले असून, त्यानुसार आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून शेकडो आॅडर्स नोंदवायच्या आणि कॅश आॅन डिलेव्हरीच्या वेळीच त्या रद्द करण्याचा प्रकार सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आॅनलाइन कंपन्या आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.  आॅनलाइन कंपन्या बाजारभावापेक्षा अधिक सूट देत असल्याने स्वाभाविकपणे ग्राहकांचा ओढा त्याकडे वाढला आहे. स्थानिक बाजारपेठेवर त्याचा परिणाम होत असून, ऐन सणासुदीत मंदीच्या सावटाखाली बाजारपेठा आहेत. इलेक्ट्रॉनिक्ससह अन्य अनेक बाजारपेठांमधील व्यापाºयांनी संघटितपणे उत्पादक कंपन्यांशी चर्चा करून आॅनलाइन कंपन्यांना सवलतीच्या दरात उत्पादने कशी दिली जातात, असा प्रश्न केला आहे. परंतु त्याचबरोबर या कंपन्यांच्या विरोधात यापूर्वीही बंद आंदोलन करणाºया ठिकठिकाणच्या व्यापाºयांनी वेगळाच आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मित्रपरिवार, कर्मचारी आणि अन्य परिचितांच्या नावाने आॅर्डर्स दिल्या जातात. संबंधित कंपन्यांनी आॅर्डर आणल्या की, त्या विविध कारणे देऊन रद्द केल्या जातात.गुजरातमध्ये अशाप्रकारचे आंदोलन सर्व प्रथम झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे याचप्रकारचे आंदोलन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात आॅर्डर रद्द झाल्यास त्या परत नेणे आॅनलाइन कंपन्यांच्या दृष्टीने खूप खर्चिक होते. त्यामुळे कंपन्या तो भाग हा काळ्या यादीत टाकतात आणि आॅर्डरच स्वीकारत नाही हेच लक्षात घेऊन आंदोलने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सेल लावणाºया आॅनलाइन कंपन्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता आहे.संगमनेरमध्ये यासंदर्भात सर्वप्रथम आॅनलाइन वस्तू मागवायच्या नाहीत अशी शपथ व्यापारी संघटनेने घेतली होती. राज्यात ठिकठिकाणी आता असे व्यापारी वर्गाला आवाहन करून संघटना आंदोलन करीत आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ७०० आॅनलाइन आॅर्डर मालाच्या डिलेव्हरीनंतर रद्द करण्यात आल्या. अनेक व्यापारी संघटनांनी तर जास्तीत जास्त आॅर्डर रद्द करणाºयांना बक्षीसही जाहीर केले आहे.  - प्रफुल्ल संचेती, कार्याध्यक्ष, नाशिक व्यापारी महासंघ

टॅग्स :onlineऑनलाइनNashikनाशिक