शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक जाणिवेतून धावले हजारो नाशिककर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:37 IST

सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने समाजातील गरजू घटकांना मदत व्हावी म्हणून ‘नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने आयोजित सतराव्या ‘नाशिक रन’मध्ये पंधरा हजारांहून अधिक नाशिककर गुलाबी थंडीत धावले आणि सामाजिक जाणिवेचा प्रत्यय दिला. समाजातील दुर्बल आणि विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना मदत करण्याच्या धर्मादाय उद्देशाने ही रन दरवर्षी असते. विशिष्ट रंगांचा लक्षवेधी टी शर्ट हा रनचे खास वैशिष्ट. यंदाही हजारो दात्यांनी यात सहभागी होतानाच भल्या सकाळी धावण्याचा आनंद सहकुटुंब नाशिककरांनी लुटला.

ठळक मुद्देनाशिक रन : समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी राबविले विविध उपक्रम

सातपूर : सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने समाजातील गरजू घटकांना मदत व्हावी म्हणून ‘नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने आयोजित सतराव्या ‘नाशिक रन’मध्ये पंधरा हजारांहून अधिक नाशिककर गुलाबी थंडीत धावले आणि सामाजिक जाणिवेचा प्रत्यय दिला.समाजातील दुर्बल आणि विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना मदत करण्याच्या धर्मादाय उद्देशाने ही रन दरवर्षी असते. विशिष्ट रंगांचा लक्षवेधी टी शर्ट हा रनचे खास वैशिष्ट. यंदाही हजारो दात्यांनी यात सहभागी होतानाच भल्या सकाळी धावण्याचा आनंद सहकुटुंब नाशिककरांनी लुटला.महात्मानगर येथील मैदानावर आयोजित ‘नाशिक रन’च्या उद््घाटन समारंभात बॉश इंडिया उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सौमित्र भट्टाचार्य, सहसंचालक डॉ. अंड्रेस वोल्फ, सहसंचालक जॉन ओलिव्हर व श्रीनिवासन, टीडीके इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक एन. बालाकृष्णन, ए. कृष्णा, उपाध्यक्ष जेन्स कुशेल, नाशिक रनचे अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी, उपाध्यक्ष एच. बी. थोन्टेश, सचिव अनिल दैठणकर, खजिनदार राजाराम कासार, विश्वस्त प्रबळ रे, अविनाश चिंतावर, अतुल खानापूरकर, अनंथरामन, संदीप पांडे, मुकुंद भट, मोहन पाटील, एबीबीचे महाव्यवस्थापक गणेश कोठावदे, एपिरॉकचे प्लांट हेड अरविंद पाटील, पोलीस उपायुक्त आर. आर. पाटील, पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक उपायुक्त अशोक नखाते, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विभागीय अधिकारी हेमांगी पाटील आदी उपस्थित होते.क़्रीडा क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी सन्मानित स्वयंलातील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर पूनम सोनूने, अभिजित हिरकुड, किसन तडवी यांनी नाशिक रनची मशाल क्र ीडांगणावर प्रदक्षिणा मारून व्यासपीठावर आगमन झाले. मयुरी नवले, श्रद्धा ठाकरे, जयश्री ठाकरे, वैष्णवी कुटे या शाळकरी गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.रनमध्ये सहभागी झालेल्या नाशिककरांसाठी १३ लकी ड्रॉ काढण्यात आले दरम्यानच्या काळात टीडीके इंडियाकडून बॉशकडे रनचे सूत्र हस्तांतरित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. अनिल दैठणकर यांनी आभार मानले व रनची सांगता करण्यात आली. यावेळी नितीन देशमुख, मेजर रोहन तांदळे, विजय काकड, गिरीश कौशिक, स्नेहा ओक डॉ. विनिता जॉर्ज, डॉ. अर्चना सायगवकर, प्रेमकुमार शर्मा आदींसह अडीचशेहून अधिक स्वयंसेवकांनी रनमध्ये आपले विविध कामांच्या माध्यमांतून योगदान दिले.

टॅग्स :NashikनाशिकMarathonमॅरेथॉन