शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

हजारो दिव्यांनी उजळले सर्वतीर्थ टाकेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 01:00 IST

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे रविवारी (दि.२९) हजारो पंत्या प्रज्वलित करून त्रिपुरारी, पणती पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देसुरक्षित अंतर राखत भाविकांकडून रामचंद्रांच्या जयघोषात दीपोत्सव

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे रविवारी (दि.२९) हजारो पंत्या प्रज्वलित करून त्रिपुरारी, पणती पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.त्र्यंबकेश्वर, पेगलवाडी येथील महंत राजेश पुरी यांचे सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील शिष्य दादाभाऊ लक्ष्मण गोसावी यांच्या हस्ते हजरो दीप प्रज्वलित करण्यात आले. मोजक्या भाविक-भक्तांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वतीर्थ संस्थानचे महंत किशोरदास श्रीवैष्णव, पंडित दिलीप पुजारी, कीर्तनकार चिमणकाका परदेशी, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, राजेंद्र घोरपडे, श्रीराम पाबळकर यांच्यासह महंत दादा गोसावी, समाधान कावळे, वैभव खोडे, विजय गोवर्धने, जनार्दन जगताप, सुनील नेवकर,गोरख बर्वे, वामन खोडे, वैभव गोसावी, रामराव भागवत, किरण गायधनी, संजय आहेर, महेश तुंगार, समाधान कांडेकर, शुभम गोसावी उपस्थित होते.सायंकाळी सहा वाजता प्रभू श्रीरामांच्या व शंकराच्या मंदिरात भक्तांनी आरती करून संपूर्ण तीर्थ परिसरात हजारो दिवे प्रज्वलित करण्यात आले. या हजारो पणत्यांच्या प्रकाशाने तीर्थ परिसर उजळून निघाला होता. हजारो दिव्यांनी येणाऱ्या सर्व भाविकांचे लक्ष वेधले.टाकेद तीर्थक्षेत्री दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. त्रिपूर असुराचा संहार झाल्याने ही पौर्णिमा दीप प्रज्वलित करून साजरी केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदा टाकेद तीर्थावर भाविकांची अल्प गर्दी पहावयास मिळाली. कोरोना लवकर जाऊ दे, असे साकडे भाविकांनी प्रभू रामचंद्रांना घातले. 

टॅग्स :Tripuraत्रिपुराigatpuri-acइगतपुरी