शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सप्तश्रृंगीदेवीच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, आजची माळ सहावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 15:16 IST

आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तश्रृंगगडावर सुरू असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवात सहाव्या माळेला मंगळवारचे औचित्य साधत राज्यभरातील भाविकांनी देवीच्या दर्शनाला गर्दी केली आहे.

सप्तश्रृंगगड (नाशिक) - आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तश्रृंगगडावर सुरू असलेल्या श्री सप्तश्रृंगी देवीच्या नवरात्रोत्सवात सहाव्या माळेला मंगळवारचे औचित्य साधत राज्यभरातील भाविकांनी देवीच्या दर्शनाला गर्दी केली आहे. मंगळवारी सकाळी 7.30 वाजता सप्तश्रृंगी देवीला सुवर्ण अलंकार अर्पण करण्यात आले. पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी 8 वाजता देवीची महापूजा करण्यात आली. दुपारी 12 वाजता देवीची पंचामृत महापूजा करण्यात येऊन हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवीची महाआरती करण्यात आली.

पहिल्या माळेपासूनच भाविकांचा सुरू झालेला ओघ आजच्या सहाव्या माळेलादेखील वाढता दिसून आला. देवीभक्तांमधील उत्साहामुळे गडावर चैतन्याचे वातावरण पसरले आहे. दैनंदिन अलंकार पूजा, मिरवणूक व पूजन आदी विधीदेखील चैतन्यपूर्ण वातावरणात व भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. गडावर जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घातल्याने केवळ एसटी बसने नांदुरी ते गड असा प्रवास करावा लागत आहे. यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. अनेक भाविक राज्याच्या कान्याकोप-यातून पायी चालत येत सप्तशृंगी देवीच्या चरणी लीन होत आहेत.

गडावर येणा-या भाविकांमध्ये तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे. नांदुरी ते गड या घाट रस्त्यावर निर्माण झालेले धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असल्याने या ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह भक्तगणांना होत असल्याचे पाहता घाट व वळणरस्त्यावर उतरून कुठेही सेल्फी न घेण्याचे, तसेच भाविकांनी स्वत:बरोबर इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन उपविभागीय महसूल अधिकारी अर्जुन श्रीनिवास यांनी केले आहे. कडक ऊन, रात्रीचा गारवा अशा वातावरणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.

फ्यूनिक्युलर ट्रॉली सुरू करण्याची मागणीसप्तश्रृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सव सुरू असून, ज्येष्ठ नागरिक व महिलांसह भाविकांना या काळात गडाच्या पाय-या चढून जावे लागू नये, म्हणून तत्काळ गडावर सुस्थितीत असलेली फ्यूनिक्युलर ट्रॉली (रोप-वे) सुरू करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गडावर फ्यूनिक्युलर ट्रॉली अद्याप सुरू झालेली नाही. वयोवृद्ध व अपंग भक्तांना यात्रा कालावधीत देवीच्या दर्शनासाठी मंदिरापर्यंत जाता यावे यासाठी फ्यूनिक्युलर ट्रॉलीची चाचणी घेऊन ती तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री. महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी सप्तशृंगी निवासिनी देवीचे आजचे रुप

 

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७