शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला रेणुकामातेच्या चरणी हजारो भक्त नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 01:29 IST

चांदवड शहरात विजयादशमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाचे सावट असले तरी चांदवड येथील कुलस्वामिनी श्री रेणुका देवी मातेच्या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. सकाळपासून दूरवर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्देविजयादशमी उत्साहात : दर्शनासाठी भाविकांची गर्दी

चांदवड : शहरात विजयादशमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाचे सावट असले तरी चांदवड येथील कुलस्वामिनी श्री रेणुका देवी मातेच्या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. सकाळपासून दूरवर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांनी बाजारपेठ फुलली होती तर झेंडूचे भाव प्रारंभी वधारल्याने नागरिकांनी खरेदी करण्यास हात आखडता घेतला. नंतर झेंडू मातीमोल भावाने विकला गेला. दरम्यान, रेणुका माता मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. गर्दीमुळे संस्थान व पोलीस प्रशासनावर मोठा ताण पडला. पूर्वापार चालत असलेल्या प्रथेनुसार श्री रेणुका देवी मातेच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते तर पालखीत श्री रेणुका मातेची प्रतिमा, सुवर्ण अलंकार, अहिल्यादेवींची प्रतिमा असते. या पालखीस मोठा पोलीस बंदोबस्त असतो. सदरची पालखी रेणुका मंदिरातून पुरातन मनमाड-लासलगाव चौफुलीवरील श्री खंडेराव महाराज मंदिरात नेण्यात येते मात्र यंदा पालखी मिरवणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थानने रद्द केली. यावेळी पालखी ऐवजी श्री. रेणुका देवीचा मुखवटा वाहनातून नेऊन परंपरेनुसार खंडेराव महाराज मंदिरात जाऊन देवी व खंडेराव महाराज यांची भेट घडवून आणल्याची माहिती सहायक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली. यावेळी खंडेराव महाराज मंदिरातही दर्शनासाठी अनेकांनी गर्दी केली होती. या मंदिरातही पुरोहित अरूण दीक्षित यांनी आपट्याची झाडे व पूजा साहित्य मांडले होते. मंत्रोचारात अनेक भाविकांनी सीमोल्लंघन केले.

इन्फो

अन्य मंदिरांमध्ये ही कार्यक्रम

दररोज श्री रेणुका देवी मंदिराचा गाभारा विविध फुलांनी सजावटीचे काम बाळासाहेब होनराव यांनी केले. संस्थानच्या वतीने पोलीस, गृहरक्षक,स्वयंसेवक व भाविकांना दररोज महाप्रसाद (भोजन) देण्यात आला. तर गर्दीवर विशेष नियंत्रण करण्यासाठी गृहरक्षक दलाच्या जवानांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान अनेकांनी घरोघरी जाऊन सोने-नाणे वाटप करून दसऱ्याचा आनंद द्विगुणित केला तर येथील म्हसोबा चौकीवरील सप्तशृंगी देवी मंदिरात तसेच म्हसोबा मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते . कोबंडवाडी येथील भैरवनाथ मंदिरातही भाविक दहा दिवस घटी बसले होते.

टॅग्स :NashikनाशिकNavratriनवरात्रीDasaraदसरा