शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात तेरा हजारांनी वाढले मूर्ती संकलन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 01:01 IST

शहरात पर्यावरणस्नेही गणेश विसर्जन करण्यास यंदाही प्रतिसाद मिळाला असून, यंदा १ लाख २९ हजार ९२३ मूर्तींचे दान स्वीकारण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत १३ हजारांनी मूर्ती संकलन वाढले आहे.

नाशिक : शहरात पर्यावरणस्नेही गणेश विसर्जन करण्यास यंदाही प्रतिसाद मिळाला असून, यंदा १ लाख २९ हजार ९२३ मूर्तींचे दान स्वीकारण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत १३ हजारांनी मूर्ती संकलन वाढले आहे. याशिवाय १०८ टन निर्माल्यदेखील संकलित करण्यात आले असून, त्या माध्यमातून गोदावरीसह अन्य नद्यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात टळले आहे.शहरातील जीवनदायिनी गोदावरी नदी तसेच नासर्डी आणि वालदेवी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नदीपत्रातील प्रदूषणाच्या विरोधात पर्यारणप्रेमी संघर्ष करीत असून, अनेकांनी त्यासाठी उच्च न्यायालयात दाददेखील मागितली आहे. महापालिका हद्दीत तरी मूर्ती आणि निर्माल्य टाकून विसर्जन होऊ नये यासाठी महापालिका १९९५-९६ पासून महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सहकार्य करीत आहेत. त्यानंतर आता महापालिका मुख्यत्वे करून मोहीम राबवित असून, अन्य अनेक सेवाभावी संस्था त्यासाठी महापालिकेला सहकार्य करीत असतात.यंदाही महापालिकेने २४ नैसर्गिक विसर्जनस्थळी तसेच २८ कृत्रिम हौदांच्या ठिकाणी विसर्जित मूर्ती दान स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक सेवाभावी संस्थांनी त्यासाठी सहकार्य करून नागरिकांनी प्रबोधन केले होते. महापाालिकेच्या सहाही विभागांत एकूण ५४ ठिकाणी मूर्ती संकलन करण्यात आले. यंदा एकूण १ लाख २९ हजार ९२३ गणेशमूर्ती संकलित झाल्या आहेत. यात नाशिक पूर्वमधून ६ हजार ९५२, नाशिक पश्चिममधून १३ हजार ३२१ मधून, सातपूरमधून २८ हजार ९४६, तर नाशिकरोड १७ हजार ६६५ याप्रमाणे मूर्ती संकलन झाले आहे.गेल्यावर्षी १ लाख १६ हजार ८९६ गणेशमूर्ती शहरातून संकलित झाल्या होत्या, त्या तुलनेत यंदा १३ हजार २७ मूर्ती संकलित करण्यात आल्या आहेत.१०८ टन निर्माल्ययंदा १०८ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. नाशिक पूर्वमधून ९.०९५, नाशिक पश्चिम ११.१२, पंचवटीत २८.५९५ टन, सिडकोत २१ टन, सातपूर येथून २४.१६ टन, तर नाशिकरोड येथील १४.०६५ टन याप्रमाणे १०८ मेट्रिक टन निर्माल्य संकलित झाले आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवNashikनाशिक