नाशिक : येथील बाजार समितीत शुक्रवारी गावठी कोथिंबिरीला तब्बल ६७ रुपये जुडीचा दर मिळाला. सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्याला एक हजार कोथिंबिरीच्या जुड्या विकून तब्बल ६७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. या सप्ताहात कोथंबिरीला मिळालेला हा उच्चांकी दर असल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात आले.नाशिक बाजार समितीत भाजीपाल्याची आवक कमी झालेली असून, मागणी वाढलेली असल्याने जवळपास सर्वच भाजीपाल्याचे दर वाढले आहे. शुक्रवारी सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील साहेबराव संपत खाडे या शेतकऱ्याने आपल्या गावठी कोथंबिरीच्या एक हजार जुड्या विक्रीसाठी आणल्या होत्या. दोन व्यापाऱ्यांनी शेकडा ६७०० रुपये दराने या कोथंबिरीची खरेदी केली. सप्ताहात कोथंबिरीला शेकडा २४०० पासून ५४०० याप्रमाणे दर मिळाला होता. शुक्रवारचा दर सर्वाधिक होता. वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. याशिवाय निर्बंध शिथिल झाल्यामुळे सर्वच ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये नाशिकचा भाजीपाला जाऊ लागल्याने सध्या भाजीपाल्याच्या दरात वाढ होत आहे.
कोथिंबिरीच्या हजार जुड्यांचे मिळाले ₹ ६७ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 00:22 IST
येथील बाजार समितीत शुक्रवारी गावठी कोथिंबिरीला तब्बल ६७ रुपये जुडीचा दर मिळाला. सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्याला एक हजार कोथिंबिरीच्या जुड्या विकून तब्बल ६७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. या सप्ताहात कोथंबिरीला मिळालेला हा उच्चांकी दर असल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात आले.
कोथिंबिरीच्या हजार जुड्यांचे मिळाले ₹ ६७ हजार
ठळक मुद्देनाशिक बाजार समिती : सप्ताहातील उच्चांकी दर