शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:45 IST

सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थींना मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले. संबंधित शिक्षकांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सातपूर: येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थींना मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले. संबंधित शिक्षकांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.सातपूर येथील शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना मशीनवर काम करावे लागत असल्याने विद्यार्थ्यांनी हाफबाहींचा शर्ट घालावा असा नियम असल्याने शुक्रवारी काही विद्यार्थी फूलबाहींचा शर्ट घालून आले होते. त्यामुळे पर्यवेक्षक एम. ए. बागुल यांनी या विद्यार्थ्यांना संस्थेत येण्यापासून मज्जाव केला. याचा राग आल्याने या विद्यार्थ्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाºयांशी संपर्क साधला असता भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश बेलदार, उपमहानगरप्रमुख मंगेश पवार, आकाश मोराडे, तसेच स्वप्नील पाखले, दत्ता गरकळ, विशाल पाटील आदींनी धाव घेऊन सदर शिक्षकांच्या विरोधात प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन पुकारले. सदर शिक्षक विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देतात, विद्यार्थ्यांना मारहाण करतात, विद्यार्थ्यांना बसायला वर्ग नाही, उपहारगृहाची सोय नाही, पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही, डासांचा त्रास होतो अशा अनेक तक्रारी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मांडल्या. संस्थेचे समन्वयक प्रशांत बडगुजर यांनी आंदोलनकर्त्यांना शांत करून त्यांची बाजू ऐकून घेतली. यापुढे असा त्रास होणार नसल्याची ग्वाही देऊन दिलगिरी व्यक्त केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले शिवाय मानसिक त्रास देणाºया शिक्षकांनीदेखील दिलगिरी व्यक्त केली.

टॅग्स :Studentविद्यार्थीITI chowkआयटीआय चौक