जे स्वत:ला मान देत नाहीत ते इतरांचा सन्मान करू शकत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 11:50 PM2020-03-09T23:50:09+5:302020-03-09T23:54:42+5:30

मालेगाव : जे स्वत:ला मान देत नाहीत ते इतरांचा सन्मान करू शकत नाहीत. आमच्याकडे सर्व काही आहे, आम्ही इतरांकडे काही मागू नये. आम्ही आपल्या स्वत:वर प्रेम करू शकलो तर ईश्वर आमच्यावर प्रेम करतील, असा संदेश शिवानीदीदी यांनी दिला.

Those who do not honor themselves cannot honor others | जे स्वत:ला मान देत नाहीत ते इतरांचा सन्मान करू शकत नाहीत

ब्रह्माकुमारी शिवानीदीदी

Next
ठळक मुद्देशिवानीदीदी : मालेगाव येथील मसगा महाविद्यालयाच्या प्रांगणात संदेश


 


 

 

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : जे स्वत:ला मान देत नाहीत ते इतरांचा सन्मान करू शकत नाहीत. आमच्याकडे सर्व काही आहे, आम्ही इतरांकडे काही मागू नये. आम्ही आपल्या स्वत:वर प्रेम करू शकलो तर ईश्वर आमच्यावर प्रेम करतील, असा संदेश शिवानीदीदी यांनी दिला.
येथील मसगा महाविद्यालयाच्या मैदानावर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे आयोजित ‘वाह जिंदगी वाह’ कार्यक्रमात शिवानीदीदी बोलत होत्या. प्रारंभी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, माजी मंत्री प्रशांत हिरे यांचा शिवानीदीदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंगलादीदी यांनी त्यांचे स्वागत केले. शिवानीदीदी म्हणाल्या, आम्ही मागणारे नाही, आम्ही देणारे आहोत. मागण्याचे कर्म बंद करुन देण्याचे काम सुरू केले पाहिजे आणि त्यासाठी कुणाला तरी एकाला दिवा जाळावा लागेल. आपण दिवाळीत दिवे जाळतो; पण ते घराबाहेर. आपण रावण जाळतो; पण तेही घराबाहेर जाळतो. जळणाऱ्या दहातोंडी रावणाचा आकार दरवेळी मोठा होत जातो. राग आमचे संस्कार आणि व्यक्तीत्व नाही. परमेश्वराकडून आपण घेवून इतरांना देणे हेच खरे सत्य आहे, असे सांगून त्या म्हणाल्या, आज आम्ही एक दुसºयाला भेटल्यावर ‘हाय’ करतो. एक दुसºयाला हाय - हाय करण्यापेक्षा ‘ओम शांती’ म्हणा. कारण शांतीची ती एक एनर्जी आहे, असेही त्या म्हणाल्या.




लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपण जे काही करायचे ते स्वत:साठी आणि परिवारासाी करा. जे आपल्यासाठी योग्य आहे तेच आपण करू. त्यासाठी इतरांकडून आपल्यासाठी काय करू, काय नको करू असे न विचारता स्वत:साठी निर्णय घ्या. कारण आपल्या निर्णय घेण्यात इतर लोकांचे मत मध्ये आड येते, असे केले तर लोकांच्या निर्णयावरच आपल्या मनाची स्थिती निर्भय होईल त्याकरीता स्वत: निर्णय घेवून आत्मनिर्भर व्हा, असा सल्ला देत त्या म्हणाल्या, आपल्या जीवनात काही बºया वाईट गोष्टी घडत असतात. आयुष्यात दररोज घडणारी नवीन घटना गोष्ट ही नवीन संधी आहे. प्रत्येक परिस्थितीत माझा दृष्टीकोन कसा आहे आपण इतरांना भेटून आपले हालचाल काय असे आपण स्वत:ला विचारा मग पहा मन काय उत्तर देते. मी कसा आहे माझे जीवन कसे ा आहे. आज काय स्थिती आहे याचे उत्तर द्या. परिस्थिती कशीही असो माझे कसे हे मला विचारायचे आहे. परिवार कसा आहे. एक शब्द स्वत:साठी आणि एक गाव परिवारासाठी आजपासून दररोज काही क्षण स्वत:ला विचारा की मी कसा आहे. दिवसभरात किती लोकांना भेटतो. भेटल्यावर दुसºयाची स्थिती विचारतो की, तुम्ही कसे आहात; दुसºयाला विचारण्यापेक्षा स्वत:ला विचारा की तुम्ही कसे आहात. स्वत:चा दृष्टीकोन बदला.
हाय करू नका
शिवाजी दीदी म्हणाल्या, आज आम्ही एक दुसºयाला भेटल्यावर ‘हाय’ करतो. एक दुसºयाला हाय - हाय करण्यापेक्षा ‘ओम शांती’ म्हणा. कारण शांतीची ती एक एनर्जी आहे. ‘निगेटीव्ह’ शब्दांची एनर्जी फील करू नये. कारण शब्दांच एक महत्व आहे. मनाची सुंदरता, मनाची पवित्रता चेहºयावर दिसते. रोज योग, मेडिटेशन केल्यास मनाचे आल्याचे ओझे कमी होवू लागते. चेहºयावर तेज दिसू लागते. म्हणजेच आपण ज्ञानाने मालामाल होतो, असे सांगून शिवानीदीदी म्हणाल्या, क्षमा करणे म्हणजे आम्ही स्वत:ला क्षमा करत आहोत. लोकांनी बाहेर आमचे नुकसान केले; परंतु आम्ही काय विचार करतो. लोक आम्हाला धोका देवू शकतात; परंतु कुणीही आम्हाला दु:ख देवू शकत नाही. त्यांनी जे केले ते त्यांचे कर्म होते. आम्ही वाईट विचार करणे बंद केले आणि त्यांना चांगला आशीर्वाद (दुवा) दिले हे आमचे कर्म आहे. आमचे कर्म करणे बदलत गेले आहे.

चौकट :
इन्फो :


२४ तास मनावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करा
आयुष्यात कुठलीही गोष्ट घडली तरी २४ तास असा विचार करा की मी चांगला विचार करेल. कुणी कितीही काहीही बोलले तरी रागावणार नाही. जे कर्मात लिहिले आहे तेच मिळेल. दुसऱ्यांना हाय-हाय करण्याची सवयी बदला. सवयींचे गुलाम होवू नका. जीवन हाय-बायसाठी नाही तर मनाला शक्तीशाली बनविण्यासाठी आहे. यासाठी दररोज एक तास स्वत:ला द्या.

टी. व्ही., मोबाईलमुळे जीवन शैलीवर परिणाम
टी. व्ही. व मोबाईलच्या अतिवापरामुळे जीवन शैलीवर परिणाम झाला आहे. टी. व्हीं. मधील मालिका बघून त्याच मालिका घराघरात सुरू झाल्या आहेत. रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी व सकाळी उठल्यानंतर मोबाईल व टी. व्ही. पाहू नका. त्यामुळे विचार बदलतील. सात्विक आहार करा. जसे अन्न तसे मन सात्विक आहार घेतल्याने राग येणार नाही.

आजी - माजी मंत्र्यांची हजेरी
म. स. गा. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या शिवानी दीदीच्या कार्यक्रमाला विद्यमान कृषी मंत्री दादा भुसे व माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी सपत्नीक हजेरी लावली होती. गेल्या अनेक वर्षांनंतर धार्मिक व्यासपीठावर आजी - माजी मंत्री एकत्र येताना दिसले.

फोटो फाईल नेम : ०९ एमएमएआर १८ / २० . जेपीजी
फोटो कॅप्शन :
फोटो फाईल नेम : ०९ एमएमएआर १९ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी झालेल्या कार्यक्रमात व्याख्यान देताना ब्रम्हकुमारी शिवानी दीदी.
फोटो फाईल नेम : ०९ एमएमएआर २१ . जेपीजी
फोटो कॅप्शन : शिवानी दीदी यांचा सत्कार करताना कृषीमंत्री दादा भुसे. समवेत माजीमंत्री प्रशांत हिरे.खुदको क्षमा करके दाग मीट जायेगास्वत:ला क्षमा करुन डाग मिटून जाईल, घटना विसरून जाईल, जखमा विसरणे फार जरूरीचे आहे. त्याचे दु:ख धरुन ठेवू नये. कारण शरीरावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे कुणी आपल्याशी कसाही व्यवहार केला तरी स्वत:च्या मनात चांगला व्यवहार आणावा. प्रत्येक विचार खरा असावा आपण स्वत:शी चांगल्या गोष्टी केला पाहिजेत.लोकांचा विचार करणे सोडादुसºयाच्या पसंतीसाठी आपण आपल्या मनावर अन्याय करीत राहतो, मन स्थिर राहत नाही, आपल्याबाबत कोणीतरी चांगले म्हटले पाहिजे ही अपेक्षा ठेवू नका, मागणे बंद करा, लोकांच्या प्रतिक्रियेची वाट पाहू नका, कोणी आपल्याला चांगले म्हणेल ही अपेक्षा ठेवली नाही तर मन प्रसन्न असते. प्रत्येकाची पसंती वेगळी असते. त्यांची पसंतीच त्यांचं व्यक्तीमत्व दर्शवत असते. लोकांनी ठरवण्यापेक्षा तुम्हाला काय आवडते असा विचार करा. स्वत:चा निर्णय स्वत: करा.मनाचा रिमोट कंट्रोल स्वत:कडे ठेवादुसºयाच्या व्यवहारांना मन दु:खी करू नका. आपल्या मनाच्या स्थितीचा रिमोट आपल्याकडे राहिला पाहिजे. रिमोट दुसºयाच्या हातात गेला तर मनाला दु:ख होते. स्वच्छ भारत नाही तर स्वच्छ मन अभियान राबवणे गरजेचे आहे. मनाची सुंदरता व पवित्रता चेहºयावर दिसून येते. चांगल्या विचारांनी मनावरील ताण कमी होतो. आपले नाव मागणाºयांच्या नाही तर देणाºयांच्या यादीत येणे गरजेचे आहे. यासाठी मनातील दिवा प्रज्वलित करा, असेही दीदी म्हणाल्या.

Web Title: Those who do not honor themselves cannot honor others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.