शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

डोक्यात दगड टाकून तेरावर्षीय मुलाचा खून

By admin | Updated: June 21, 2015 23:58 IST

दिव्यदान हॉस्टेल आवारातील घटना : खुनाचा गुन्हा

नाशिक : शहरात खुनाची मालिका अद्याप सुरूच असून, गंगापूररोडवरील दिव्यदान हॉस्टेलच्या आवारात तेरावर्षीय मुलाच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याचा प्रकार रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आला़ खून झालेल्या मुलाचे नाव गोलू ऊर्फ विशाल शालिग्राम भालेराव (१३) असे असून, तो आसारामबापू आश्रमाजवळील शिंदे चाळ येथील रहिवासी आहे़ शनिवारी दुपारपासून हा मुलगा घरातून निघून गेलेला होता़ दरम्यान, दोन दिवसांपूर्वी लहान मुलांच्या भांडणातून हा खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे़रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गंगापूररोडवरील दिव्यदान हॉस्टेलचे फादर थॉमस फ्रान्सिस चालीसेरी यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फोन करून हॉस्टेलमधील एका झाडाखाली मुलाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती दिली़ त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी केली. अंगात लाल रंगाचा टी-शर्ट व अर्धनग्न अवस्थेत या मुलाचा मृतदेह पालथा पडल्याचे दिसून आले़ या मुलाच्या डोक्यावरील जखमांवरून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला़ ओळख न पटल्याने पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला़खून झालेल्या या मुलाची ओळख दुपारनंतर पटली व त्याचे नाव गोलू ऊर्फ विशाल शालिग्राम भालेराव असे असल्याचे समोर आले़ आसारामबापू आश्रमाजवळील शिंदे चाळीत राहणारा विशाल शनिवारी दुपारपासून घरातून निघून गेला होता़ तसेच दोन दिवसांपूर्वी विशालचा काही मुलांशी वाद झाल्याची माहितीही पोलीस तपासात समोर आली़ या प्रकरणी शालिग्राम भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त एस़जगनाथन, पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ, एन. अंबिका, श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त विजय चव्हाण, सचिन गोरे यांनी भेट देऊन गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर काळे यांनी तपासाच्या सूचना दिल्या़ रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी खुनातील संशयितांचा शोध घेत होते़ (प्रतिनिधी)