शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वर्षी बदलणार तिसरी, बारावीचा अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 15:55 IST

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्र्णय पाठ्यपुस्तक मंडळाने घेतला असून, सुधारित अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या छपाई आणि वितरणाचे काम सुरू असतानाच २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि बारावीचा अभ्यासक्रमही नव्याने प्रकाशित करण्याचा विचार सुरू आहे.

ठळक मुद्देतिसरी आणि बारावीचा अभ्यासक्रमही बदलणार मनपा शिक्षणाधिकाऱ्यांचे प्रसिद्धीपत्रक

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्र्णय पाठ्यपुस्तक मंडळाने घेतला असून, सुधारित अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या छपाई आणि वितरणाचे काम सुरू असतानाच २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि बारावीचा अभ्यासक्रमही नव्याने प्रकाशित करण्याचा विचार सुरू आहे.तिसरी व बारावीच्या अभ्यासक्रमांचे २०१९-२० हे अखेरचे शैक्षणिक वर्ष असल्याचे पत्र पाठ्यपुस्तक महामंडळांकडून काढण्यात आले असून, याविषयीची माहिती नाशिक महानगर पालिकेचे प्रशानाधिकारी तथा शिक्षणाधिकारी उदय देवरे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यातून दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून दुसरी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमामध्ये तोंडी, प्रकल्प परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी देण्यात येणारे गुण बंद होणार आहेत. प्रात्यक्षिके असलेले विषय वगळता सर्व विषयांची शंभर गुणांची परीक्षा होणार आहे. एनसीईआरटीच्या नव्या निर्देशानुसार राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी अभ्यासक्रम बदलण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार गतवर्षी दहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला होता. तर २०१९-२० शैक्षणिक वर्षात दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर पुढील वर्षी तिसरी आणि बारावीचा अभ्यासक्रम बदलणे प्रस्तावित असल्याचे उदय देवरे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यातून स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका