शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीची तिसरी यादी  एक आॅगस्टला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:41 IST

आॅनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दोन फेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, यातील सुमारे ११ हजार १२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर गुरुवारी (दि. १) तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

नाशिक : आॅनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दोन फेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, यातील सुमारे ११ हजार १२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर गुरुवारी (दि. १) तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीनुसार प्रवेशाची संधी मिळणाºया विद्यार्थ्यांना २ ते ५ आॅगस्टदरम्यान प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून १२ जुलैला पहिली यादी जाहीर झाली. त्यात १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. त्यातील ८ हजार १७१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतले, तर २२ जुलैला जाहीर झालेल्या दुसºया यादीत ६ हजार ६४२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली, त्यातील २ हजार ९५६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतले असून आतापर्यंत सुमारे ११ हजार १२७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयांत जाऊन प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली आहे. दुसºया यादीत आरवायके महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा खुल्या प्रवर्गातील कटआॅफ सर्वाधिक ८९.४० टक्के तर बीवायके महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा कटआॅफ ८४.४० टक्के लागला होता. काही विद्यार्थ्यांनी दुसºया पसंतीच्या महाविद्यालयांमध्येही प्रवेश घेतला.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी