शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

‘आॅनलाइन’, खरीदने,  बेचनेसे पहले सोचो़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:29 AM

‘ओएलएक्स़ इन, यहाँ पें सबकुछ बिकता हैं’ यांसारख्या स्लोगन असलेल्या आॅनलाइन पोर्टलवर गृहोपयोगी वस्तुंबरोबरच वाहनांच्या खरेदी-विक्रीची जाहिरात केली जाते़मात्र, या पोर्टलवरील जाहिरातीत देण्यात आलेल्या तपशिलाचा वापर नागरिकांची फसवणूक व गंभीर गुन्ह्यांसाठी केला जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे़

नाशिक : ‘ओएलएक्स़ इन, यहाँ पें सबकुछ बिकता हैं’ यांसारख्या स्लोगन असलेल्या आॅनलाइन पोर्टलवर गृहोपयोगी वस्तुंबरोबरच वाहनांच्या खरेदी-विक्रीची जाहिरात केली जाते़मात्र, या पोर्टलवरील जाहिरातीत देण्यात आलेल्या तपशिलाचा वापर नागरिकांची फसवणूक व गंभीर गुन्ह्यांसाठी केला जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे़ या पोर्टलवर विक्रीसाठी असलेल्या कारची नक्कल करून तिचा गुन्ह्यात वापर केल्याने मूळ मालकाची पोलिसांनी चौकशी केल्याची घटना नुकतीच औरंगाबादमध्ये घडली, तर नाशिकमध्ये घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीने पोर्टलवरील कारसारखी कार तयार करून तिचा वापर केल्याचे समोर आले़ त्यामुळे आॅनलाइन पोर्टलवर, खरीदने- बेचनेसे पहले सोचो असे म्हणण्याची वेळ आली आहे़  गृहोपयोगी वस्तू असो वा कार यांच्या विक्रीसाठी जाहिरातीवर एक रुपयाही खर्च न करता पोर्टलवर मोफत जाहिरात करा, असे आवाहन जाहिरातींमधून केले जाते़ त्याुनसार नागरिकही वस्तू वा कार यांची संपूर्ण तपशील या पोर्टलवर टाकतात व कार विक्रीस मदतही होते़ मात्र, या पोर्टलवरील जाहिरातीच्या तपशिलाचा वापर करून त्यानुसार हुबेहूब कार तयार करून तिचा वापर घरफोडी, चेनस्रॅचिंग, फसवणुकीसाठी करणाºया दिल्लीतील आंतरराज्यीय शकील उर्फ मुल्ला इस्माइल कुरेशी या टोळीस नाशिक पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये अटक केली़  शहरात वेगवेगळ्या रस्त्यांद्वारे आगमन, घरफोडीचे परफेक्ट प्लॅनिंग, अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत किमती ऐवज साफ केल्यानंतर टोलनाके वाचवत विविध दिशांना फरार होण्याबरोबरच घरफोडीपूर्वी व त्यानंतर मोबाइलचा वापर न करण्याबरोबरच कोणताही इलेक्ट्रॉनिक पुरावा हाती लागणार नाही याची पुरेपूर काळजी कुरेशी गँग घेत असे़ शहरात प्रवेश करण्यासाठी वापरत असलेल्या स्विफ्ट कारचा नंबर हा शहरात प्रवेश करण्यापूर्वी त्याची नंबरप्लेट बदललेली असे़ ओएलएक्स या साइटवर विक्रीसाठी असलेली हुबेहूब रंग व मॉडेलच्या कारचा नंबर ते कारवर लावून तिची परिपूर्ण माहिती सोबत ठेवत असत़ केवळ दिवसा घरफोडी करणाºया कुरेशी गँगने शहरात वर्षभरात अकरा घरफोड्या करून लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला होता़ त्यापैकी २५ लाख रुपयांचा मुद्देमाल या टोळीकडून जप्त करण्यात आला़ विशेष म्हणजे या टोळीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली या ठिकाणीही घरफोड्या केल्याचे समोर आले़ त्यामुळे नागरिकांनी आॅनलाइन पोर्टलवरील वाहन विक्रीची जाहिरात करताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे़ओएलएक्स या साइटवर विक्रीसाठी असलेली हुबेहूब रंग व मॉडेलच्या कारचा नंबर ते कारवर लावून तिची परिपूर्ण माहिती सोबत ठेवत असत़ कोणताही पुरावा शिल्लक न ठेवल्याने आतापर्यंत ते कधीही पकडले गेले नव्हते़ महत्त्वाचे म्हणजे वेबसाइट वा पोर्टलवर वाहनविक्रीची जाहिरात करावयाची असेल तर संपूर्ण माहिती द्यावीच लागते, त्याशिवाय पर्याय नसतो़ या माहितीचा सराईत गुन्हेगार वापर करून जाहिरातीतील वर्णनाशी मिळता-जुळता रंग व नंबरप्लेट बदलून गुन्ह्यासाठी वापर करतात़ यामुळे पोलिसांनी मूळ वाहनमालकांची शहानिशा करण्यासाठी चौकशी केल्याची अनेक उदाहरणे आहेत़  - आनंदा वाघ, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट एक, नाशिकगुन्हेगाराकडून वाहन जप्त केले की पोलीस सर्वप्रथम वाहनमालकाचा शोध घेऊन त्याची चौकशी सुरू करतात़ यामध्ये वस्तू खरेदी-विक्री करणाºया पोर्टलवर वाहनमालकाने जाहिरात केल्याचे तसेच गुन्हेगारांनी या जाहिरातीतील तपशिलाचा वापर केल्याचे समोर येते़ पोलीस चौकशीत सत्य बाहेर येत असले तरी याचा त्रास जाहिरात करणाºयाला सोसावाच लागतो़ त्यामुळे या प्रकारच्या पोर्टलवर जाहिरात करतानाच सावधानता बाळगणे आवश्यक आहे़ आपल्या माहितीची प्रोटेक्शनची जबाबदारी संबंधित पोर्टलने घ्यायला हवी, मात्र ते घेत नाही़ त्यामुळे आपणच आपली काळजी घेणे गरजेचे आहे़ - तन्मय दीक्षित, सायबर फॉरेस्की एक्सपर्ट, नाशिक