शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
2
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
3
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
4
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
5
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
6
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
7
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
8
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
9
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
10
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
11
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
12
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
13
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
14
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
15
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
16
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
17
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
18
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
19
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
20
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वडाचीवाडी परिसरात चोऱ्या, जाळपोळीने दहशत

By admin | Updated: January 11, 2017 00:12 IST

वडाचीवाडी परिसरात चोऱ्या, जाळपोळीने दहशत

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील आदिवासी भागात होणाऱ्या चोऱ्यांमुळे परिसरात चिंता व्यक्त होत असून, चोऱ्यांबरोबरच जाळपोळीच्या घटनेने आदिवासींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले  आहे.  मोठ्या मेहनतीने आदिवासी शेतकऱ्यांनी पिकविलेले भाताचे पीक, घरातील संसारोपयोगी वस्तू आदिंच्या भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. येथील माजी सरपंच त्र्यंबक डमाळे यांच्या राहत्या घराजवळ लावलेल्या दोन मोटारसायकली अज्ञात चोरट्यांनी लांबविल्या. यातील एक सीडी डीलक्स मोटारसायकल (क्र. एमएच १५ ७९२१) ही अर्धवट जळालेल्या अवस्थेत, तर दुसरी दुचाकी (क्र. एमएच १५ ईएल ९१३४) ही चार किलोमीटर अंतरावर नेऊन जाळण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, यापूर्वी शहरात गाड्या जाळण्याचा प्रकार होत होता तो आता ग्रामीण भागातही होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. डमाळे यांच्या पत्नी सकाळी उठल्यानंतर बाहेर येऊन बघितले असता दोन्ही मोटारसायकल दिसल्या नाहीत. त्यांनी आरडाओरड करत केली असता यावरून नागरिकांनी गाड्यांचा शोध घेतला असता ६०० ते ७०० मीटरवर एका शेतामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत त्यांना एक मोटारसायकल दिसली. त्यानंतर डमाळे यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली. अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार यू. डी. अहिरे, कर्डक करीत आहेत.