शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रोकडोबावाडीत तामिळनाडूच्या चोरट्यांचा मुक्काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 01:21 IST

तामिळनाडू राज्यातील मूळ रहिवासी असलेल्या मोबाइल चोरट्यांच्या टोळीने मागील काही दिवसांपासून देवळाली गावाजवळील वालदेवी पुलालगतच्या रोकडोबावाडीत मुक्काम ठोकला होता. या टोळीतील चोरांच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवत पर्दाफाश केला. अर्धा डझन चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांच्या ताब्यातील ५४ मोबाइल हस्तगत केले आहेत.

ठळक मुद्दे५४ मोबाइल जप्त : आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी लावला छडा

नाशिकरोड : तामिळनाडू राज्यातील मूळ रहिवासी असलेल्या मोबाइल चोरट्यांच्या टोळीने मागील काही दिवसांपासून देवळाली गावाजवळील वालदेवी पुलालगतच्या रोकडोबावाडीत मुक्काम ठोकला होता. या टोळीतील चोरांच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवत पर्दाफाश केला. अर्धा डझन चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांच्या ताब्यातील ५४ मोबाइल हस्तगत केले आहेत.

रोकडोबावाडीत नव्याने वास्तव्यास आलेल्या परप्रांतीय तरुणांच्या हालचाली आणि वर्तणुकीवर येथील रहिवाशांना संशय आला. याबाबतची गोपनीय माहिती उपनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी प्रजित ठाकूर यांना मिळाली. ठाकूर यांनी या माहितीवरून बारकाईने खातरजमा केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, कुंदन जाधव, उपनिरीक्षक विकास लोंढे, अतुल पाटील, अशोक साळवे, गणेश भागवत आदींच्या पथकाने शनिवारी (दि.७) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रोकडोबावाडी येथे संशयितांच्या घरी छापा टाकला. यावेळी पोलीस पथकाला नाशिकसह जळगाव व इतर जिल्ह्यांतून या चोरट्यांनी लांबविलेले नागरिकांचे ५४ मोबाइल आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मुरली मुरुगुन (२४), जगदीशन पल्लानी (३०), व्यंकटेश शंकर (३३), मंगेश पेरूमल (३०), मोहन रंगन (३०), आरमुघम सुब्रमणी (३३, सर्व. रा.वेल्लूर) या सहा संशयितांना अटक केली.

---इन्फो--

जळगावातून नाशिकला स्थलांतर

नाशिक, जळगाव व इतर जिल्ह्यांतील या आंतरराज्यीय मोबाइल चोरी करणाऱ्या टोळीकडून ५४ मोबाइल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. संशयित हे काही दिवसांपूर्वीच जळगाव येथून नाशिकरोडला आल्याचे त्यांच्याकडे मिळालेल्या रेल्वे तिकिटावरून स्पष्ट झाले आहे. हे सहा संशयित चोरटे रोकडोबावाडीसारख्या स्लम परिसरात वास्तव्य करण्यास प्राधान्य देत होते. जेणेकरून त्यांच्या वागण्यावर कोणालाही संशय येऊ नये.

---इन्फो---

उत्तर महाराष्ट्रातील मोबाइल चोरी; तामिळनाडूमध्ये विक्री

सकाळच्या सुमारास घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी किंवा पालेभाज्या, दूध खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवत आणि त्यांच्या घरांमधून मोबाइल लंपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, चोरलेले मोबाइल तामिळनाडूमधील विविध शहरांमध्ये कमी किमतीत या टोळीकडून विक्री केले जात होते. संशयितांची तमिळ मातृभाषा असल्यामुळे पोलिसांना चौकशी करताना काही प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी