शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

चोरट्यांकडून लाखोंचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:17 IST

सिन्नर येथील तिघा सराईत चोरट्यांना नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत त्यांच्याकडून विविध चोरीतील सुमारे लाखोंचा ऐवज जप्त केला आहे.

नाशिकरोड : सिन्नर येथील तिघा सराईत चोरट्यांना नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत त्यांच्याकडून विविध चोरीतील सुमारे लाखोंचा ऐवज जप्त केला आहे.सिन्नरचे सराईत चोरटे हे वास्को चौकात चोरीच्या उद्देशाने आल्याची माहिती नाशिकरोड गुन्हे शोधपथकाचे कर्मचारी विशाल पाटील यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, मिलिंद पवार, किशोर खिल्लारे, मुदस्सर पठाण, महेश सावळे, कय्युम सय्यद, निखिल वाघचौरे, सोमनाथ जाधव यांनी वास्को चौकात सापळा रचून संशयित राहुल दिलीप धोत्रे (वय १९ रा. ऐश्वर्या गार्डनजवळ मस्जिदमागे सिन्नर), रोशन किसन महात्मे (वय २१, रा. शिवाजीनगर, सिन्नर) या दोघांना पकडले.कसून चौकशीत गुन्हे उघडकीस त्यांची कसून चौकशी केली असता त्यांचा तिसरा साथीदार सिन्नर तालुक्यातील डुबेरगाव येथील मोहन सुभाष वाजे (१८) यासदेखील पोलिसांनी ताब्यात घेतले.  तिघा सराईत चोरट्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून दीड तोळ्याची ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, ५० हजार रुपये किमतीची डिस्कव्हर, होंडा शाइन दुचाकी तसेच अंबड परिसरातील चोरीतील २० हजार रुपये किमतीचा एलसीडी टीव्ही असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी