शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

चोरट्यांचा धुमाकूळ; गस्तीची मागणी

By admin | Updated: September 14, 2015 22:46 IST

चोरट्यांचा धुमाकूळ; गस्तीची मागणी

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, रविवारी रात्री गावात चार ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला. यात चोरट्यांनी रोख २५ हजार रुपये चोरून नेले असून, तीन ठिकाणी चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. येथील श्रीराम चौकात चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोड्या केल्या. सोमवंशी टी हाउसचा मागचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. गल्ल्यातील २५ हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. त्याचबरोबर चोरट्यांनी दुकानातील दुचाकी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. तथापि, दरवाजातून गाडी न निघाल्याने त्यांनी रोख रक्कम घेऊन पळ काढला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा विकास उगले यांच्या किराणा दुकानाकडे वळविला. उगले यांनी दुकानात रोख रक्कम न ठेवल्याने चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. चोरट्यांनी जवळील सचिन गव्हाणे यांचे गुदाम फोडले. गुदाममधील माल अस्ताव्यस्त केला. त्यानंतर अशोक नरोडे यांच्या मालकीच्या खोलीत असणाऱ्या रहिवाशाच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तेथेही चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. पाथरे येथे चोरटे आल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस सोमवारी उशिरा घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी पाथरे येथे अशोक घोटेकर यांच्या घराजवळून दुचाकी चोरीला गेली आहे. जनावरे चोरीला जाण्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. पाथरे हायस्कूलमधून ५० हजारांचे संगणक चोरीला गेल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला आहे. पाथरे परिसरात दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांनी पाथरे शिवारातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)