शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांच्या पाच दुचाकींवर चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 15:46 IST

पाथर्डी फाटा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयाशेजारी असलेल्या अनधिकृत पार्किंगमधून एक दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : शहरात वाहन चोरीचे सत्र सुरु असून चोरट्यांनी विविध ठिकाणांवरुन चार दुचाकी लंपास केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या सर्व वाहन चोर्‍या जून महिन्यातील आहेत. याप्रकरणी पंचवटी, गंगापुररोड, सातपुर, अंबड पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे.हनुमानवाडी येथील ओंकार हाईटस या इमारतीच्या पर्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरल्याचा प्रकार २६ जुनला घडला. येथील राम बाबुराव सानप यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांची दुचाकी (एमएच १५ बीएच ९१३६) ही दुचाकी इमारतीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.गंगापुर रोडच्या पंपींग स्टेशन परिसरातील चिंतामणी अपार्टमेंट येथील इमारतीच्या पार्किंमध्ये पार्क केलेली प्रल्हाद खंडेराव जाधव यांची (एमएच १५ बीवाय ८९११) ही हिरो होंडा स्पलेंडर दुचाकी २६ जुनला चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी गंगापुर रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तिसरी घटना सातपुर औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या गेटसमोरील पार्किंमध्ये घडली. येथे पार्क केलेली महेश पितांबर ठोंबरे (रा. अक्षरधाम रो हाऊस, पंचवटी अग्रा रोड) यांची (एमएच १५एचके ५९३५) ही दुचाकी २२ जुनला चोरट्यांनी लंपास केली.पाथर्डीफाटा येथे उड्डाणपुलाखाली पार्क केलेली येथील वेदांतनगरमध्ये राहणारे प्रविण भिकाजी पगार यांची (एमएच १५एचडी ९१६१) दुचाकी चोरट्यांनी लंपास केली.पाथर्डी फाटा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयाशेजारी असलेल्या अनधिकृत पार्किंगमधून एक दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रवीण भिकाजी पवार ( २५ रा. कडवेनगर, पाथर्डी फाटा) यांनी त्यांची यामाहा मोटारसायकल (एम एच१५ एचडी ९१६१) पाथर्डी फाटा येथे वाहतूक शाखा कार्यालयाच्या शेजारील अनधिकृत पार्किंगमध्ये लावून ते कामावर गेले होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी