शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांकडून चोरटे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 19:25 IST

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यात वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून पिंपळगाव ...

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : वाहन चोरांच्या आवळल्या मुसक्या

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यात वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून पिंपळगाव बसवंत पोलिसांनी चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करत वाहन चोरांना गजाआड करण्यात यश आले आहे. सदर आरोपी येवला येथे सध्या राहत असून ते हरियाणा व राजस्थान येथील मूळ रहिवाशी आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड रोड येथे राहणाऱ्या दिलीप नथू पाटील संधान यांची सफेद रंगाची महिंद्रा पिकअप बोलेरो एम एच १५ सी के .९९४७ गुरुवार दि.३ जून रोजी चोरी झाल्याची तक्रार पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दाखल झाली होती .त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल नितीन जाधव, मिथुन घोडके,पोलीस शिपाई संदीप दराडे,योगेश धोंगडे यांनी कसून तपास करण्यास सुरुवात केली. एका गुप्त माहितीदाराने पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांना पिकअप घेऊन जात असल्याची माहिती दिली. तत्काळ पोलीस कर्मचारी नितीन जाधव ,मिथुन घोडके,संदीप दराडे,योगेश धोंगडे यांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी धाव घेतली. पोलिसांना बघताच चोरटे पिकअप घेऊन पळून जाऊ लागले. तेव्हा सिनेस्टाईलने पाठलाग करत अखेर पोलिसांनी अथक प्रयत्नाने चोरट्यांना ताब्यात घेतले व गजाआड केले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे चोरीला गेलेली वाहने लवकरात लवकर सापडतील व चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जातील असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.एका गुप्त माहितीदाराकडून पिकअप घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यावर तातडीने त्याचा सिनेस्टाईलने पाठलाग करत त्या चोरट्यांना ताब्यात घेतले. वाहनधारकांनी सतर्क राहून आपले वाहन पार्क करावे तसेच कोणावर संशय आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.- भाऊसाहेब पटारे, पोलीस निरीक्षक, पिंपळगाव बसवंत 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी