शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रयत क्रांती संघटनेचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 18:13 IST

सटाणा : विविध मागण्यांचे निवेदन सादर

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत बरेच शेतकरी कर्जमुक्ती पासून वंचित

सटाणा : कोरोनाचे संकट आणि त्यात शेतकरी विरोधी धोरणामुळे महाराष्टत गेल्या तीन महिन्यात १२०५ शेतकयांनी आत्महत्या केल्या आहेत. तरी देखील शासन शेतकरी विरोधी धोरण बदलण्यास तयार नसल्याने संतप्त झालेल्या रयत क्र ांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२९) येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन छेडले. दरम्यान सहाय्यक निबंधक महेश भडांगे यांनी त्यांच्या मागण्या शासनस्तरापर्यंत पोहचवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आदोलन मागे घेण्यात आले.रयत क्र ांती संघटनेचे पदाधिकारी दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली दुपारी १२ वाजता विविध मागण्यांसाठी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात अचानक ठिय्या आंदोलन करण्यात आले .यावेळी महाराष्ट्र शासनाने शेतकरी कर्जमुक्त केलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही बँक कर्ज देत नाही, त्या शेतक-यांना खरीपसाठी पिककर्ज त्वरीत मिळावे . महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची दि . १ एप्रिल २०१५ पासून अंमलबजावणीची घोषणा केली परंतु, आजपावेतो कुठल्याही शेतक-याच्या कर्ज खात्यात रक्कम जमा झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत बरेच शेतकरी कर्जमुक्ती पासून वंचित आहेत . अशा थकबाकीदार शेतक-यांना कर्जमुक्त होण्यासाठी शासनाने १ जून २००९ पासून कर्जमुक्त करावे. मका हमीभाव केंद्रात बारदान उपलब्ध नसल्यामुळे संथ गतीने खरेदी चालू आहे त्याचा वेग वाढवावा . विद्युत महामंडळाने ग्रामिण भागात अव्वाच्या सव्वा विजिबले दिलेली आहेत ते शासनाने स्वत : च्या तिजोरीतून भरावेत, आदीसह विविध मागण्या मांडण्यात आल्या. आंदोलनात रयत क्र ांती शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विशाल पवार, राज्य सरचिटणीस डोंगर पगार, राज्य कार्यकारणी सदस्य दिपक पगार, शेतकरी भिका बापू धोंडगे, रमेश अहिरे, मधुकर पगार, शरद लोटन पगार, नरेंद्र पगार, विशाल धोंडगे, चिंतामण शिरोळे, ज्ञानेश्वर पगार, विरेंद्र पगार आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Nashikनाशिक