शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
2
रुबलच नाही तर चिनी चलन वापरून भारत करतंय तेल खरेदीचं पेमेंट; रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावा
3
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
4
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
5
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...
6
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
7
वर्षाला व्याजच ५०० कोटी मिळेल, किंग खानला पान मसाल्याच्या जाहिरातीची वेळ का यावी? ध्रुव राठीचा सवाल
8
Diwali 2025: गोसेवा ही दत्त कृपेची गुरुकिल्ली? वसुबारसेच्या मुहूर्तावर जाणून घ्या 'हे' गुपित!
9
FASTag वार्षिक पास २ महिन्यांतच ठरला 'सुपरहिट'; २५ लाख युजर्सचा आकडा पार, किती झालं ट्रान्झॅक्शन?
10
दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा
11
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
12
त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
13
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
14
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
15
जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल
16
भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?
17
शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,४०० च्या वर, खासगी बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी
18
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
19
BSNLची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ १ रुपयांत महिनाभर चालेल इंटरनेट; सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगही, पाहा
20
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ

व्हीप टाळण्यासाठी त्यांनी प्रवेशद्वाराशीच ठेवले बॉडीगार्ड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:28 IST

अटी-शर्ती लादणाऱ्या काही भाजप नगरसेवकांनी आधी महापौरपदाचा उमेदवार कोण ते सांगा, मगच येतो असे सांगितल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठी अडचण झाली.

नाशिक : अटी-शर्ती लादणाऱ्या काही भाजप नगरसेवकांनी आधी महापौरपदाचा उमेदवार कोण ते सांगा, मगच येतो असे सांगितल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठी अडचण झाली.महापौरपदाच्या निवडणुकीला आता खरी रंगत वाढू लागली आहे. पक्षाची उमेदवारी मिळवताना प्रत्येक इच्छुक जणू पक्षाच्या नियमांचे पालन करू अशी शपथ घेतात आणि पहिली दोन-तीन वर्षे सुरळीत झाल्यानंतर पक्षाला कोणी मोजत नाही. सध्या सत्ताधारी भाजपात हेच होत आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मूळ भाजप कार्यकर्त्यांपेक्षा आयाराम आणि नवख्यांना संधी देण्यात आली. तीच आता पक्षाला अडचणीची ठरू लागली आहे. शनिवारी (दि.१६) नगरसेवकांची जमवाजमव करून त्यांना आणताना पदाधिकाºयांची कसरत झाली, तीन-चार जणांचे दूरध्वनी बंद होते, तर एका नगरसेवकाने आपले घर बंद ठेवले आहे. दुसरीकडे विषय पत्रिका किंवा पक्षादेश आणून कोणी घरावर चिटकवू नये यासाठी म्हणे घराभोवती बॉडीगॉर्ड ठेवले आहेत. पक्षादेश ठीक परंतु महासभेची विषयपत्रिका टाळल्यास काय करायचे याबाबत महापालिकेचा नगरसचिव विभागप्रसंगी जिल्हाधिकारी तथा महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीचे पीठासन अधिकारी यांचा सल्ला घेणार आहे. त्यांचे निर्देश असल्यास पोलीस संरक्षणात विषयपत्रिका देऊन पंचांची स्वाक्षरी घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.या निवडणुकीत हाच एक प्रकार नाही तर अनेक प्रकार चर्चेत आहेत. सहलीच्या निमित्ताने नगरसेवकांवर नजर ठेवण्यात येत असल्याने अनेकांनी विविध कारणे देऊन टाळाटाळ केली. भाजपच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाला महापौरपदी उमेदवारी मिळण्याची शंका वाटत आहे.कुटुंब गेले सहलीला..भाजपचे एकूण ६५ नगरसेवक आहेत. मात्र सहलीवर ४८ गेले आहेत. परंतु त्यातील अनेकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना बरोबर घेतले असून, नगरसेवकांवर नजर ठेवण्यासाठी काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी नेण्यात आले आहेत. या सर्वांची संख्या ११५ वर गेली आहे. निवडणुकीतील अनेक नगरसेवक जिवाची निवडणूकदेखील करीत असतात. हा अनुभव अर्थातच नवा नाही. शिवसेनेने मात्र नगरसेवकांच्या कुटुंबातील सदस्यांना बरोबर नेण्यास मनाई केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक