मनमाड : भालूर जिल्हा परिषद गटात अयोजीत नेत्रतपासणी शिबिरातील ३५ रुग्णांवर पुणे येथे यशस्वी मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून या रुग्णांचे मनमाड येथे येताच स्वागत करण्यात आले.येथील पंकज खताळ पाटील मित्रमंडळाच्या पुढाकारातून आयोजीत या उपक्रमामुळे ग्रामिण भागातील दृष्टीहीन ग्रामस्थांना दिपोत्सवाच्या दिव्यांचा झगमगाट पहाण्यासाठी नवीन दृष्टी मिळाली आहे.एच व्ही देसाई आय हॉस्पीटल पुणे , मानवकल्याण हितवासी सेवाभावी संस्था व भाजपा जिल्हाउपाध्यक्ष पंकज खताळ पाटील मित्रमंडळाच्या सहकार्यातून गटातील १२ गावांमधे मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजीत करण्यात आले होते.या तपासणीत मोतीबिंदूचे ९५ रुग्ण आढळून आले. या पैकी ३५ रुग्णांना बसने पुणे येथे शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले होते. या रुग्णांचा जाण्या येण्याचा तसेच वैद्यकीय सर्व खर्चाचा भार संस्थेच्या वतीने उचलण्यात आला आहे.शस्त्रक्रिया करूण मनमाड येथे परत आल्यानंतर या रुग्णांचे स्वागत करण्यात आले. डॉ. एजाज शेख, डॉ. यादव,डॉ. भरके, मधूकर खताळ, अनिल पगार, नरेश फुलवाणी,सुभाश अव्हाड,बाळासाहेब माळवतकर, भालूरचे सरपंच संदिप अहेर, संजय निकम, डॉ. माधव पाटील, डॉ. सागर कोल्हे,अक्षय खताळ, अजिंक्य खताळ यांच्यासह नागरीक उपस्थित होते.
दीपोत्सवाचा उजेड पहाण्यासाठी ‘त्यांना’ मिळाली ‘दृष्टी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 18:30 IST