शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पीपीई सुट घालून आले अन् सुकामेवा घेऊन गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:58 IST

पंचवटी : गेल्या आठवड्यात पीपीई सुट परिधान करून आलेल्या चोरट्यांनी सराफी दुकाने फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पहाटेच्या सुमाराला मेरी-अमृतधाम लिंकरोडवर असलेल्या एका मॉलचे शटर उचकटून चोरट्यांनी प्रवेश केला.

ठळक मुद्देचोरट्यांनी फोडले मॉल : तीच अल्टो कार सीसीटीव्हीत कैद

पंचवटी : गेल्या आठवड्यात पीपीई सुट परिधान करून आलेल्या चोरट्यांनी सराफी दुकाने फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पहाटेच्या सुमाराला मेरी-अमृतधाम लिंकरोडवर असलेल्या एका मॉलचे शटर उचकटून चोरट्यांनी प्रवेश केला.यावेळीसुद्धा ओळख पटू नये म्हणून चोरट्यांंनी पीपीई सुट घातलेला असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. चोरटे अल्टो कारमधून आल्याचे फुटेजमधून स्पष्ट होते. अल्टो कारधारक पीपीई सुटमधील या भुरट्या चोरट्यांनी नाशिक पोलिसांना चांगलेच आव्हान दिले आहे. मॉलमधून चोरट्यांनी सुकामेवा व दोन हजार रु पयांची रोकड लंपास केल्याचे आढळून आले आहे. मेरी-अमृतधाम लिंकरोडवरील वरदविनायक मंदिराजवळ आकाश शांताराम बोंडे यांच्या मालकीचे हाय स्ट्रीट मार्ट मॉल आहे. सोमवारी पहाटेच्या वेळी एका राखाडी रंगाच्या अल्टोकारमधून आलेल्या चौघा संशियतांपैकी तिघांनी काहीतरी लोखंडी वस्तूच्या साहाय्याने शटर उचकटून दुकानात प्रवेश करत गल्ला तसेच काजूबदाम असलेले ड्रायफूटचे तीन ते चार पाकिटे चोरी केली. दुकानातील गल्ल्यात अंदाजे तीन हजार रु पयांची रोकड होती तसेच ६ ते ७ हजार रुपयांचे ड्रायफूट असा जवळपास अंदाजे दहा हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे फरार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पहाटेच्या सुमारास सुरक्षारक्षक मॉलच्या मागील बाजूस झोपलेला असताना चोरट्यांनी संधी साधली. घटनेचे वृत्त कळताच सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय वानखेडे, हवालदार संदीप शेळके, नितीन जगताप आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. भुरटे चोर हिरावाडीतील?काही दिवसांपूर्वी म्हसरूळ शिवारात असलेल्या एका देशी-विदेशी दारू दुकानातून हजार रु पयांची रोकड चोरणारे संशयित व मेरी-अमृतधाम लिंकरोडवरील मॉलमध्ये चोरी करणारे संशयित यांनी पांढऱ्या रंगाचा पीपीई सुट घातल्याने दोघा घटनेतील संशयितांचे वर्णन मिळतेजुळते आहे. हे चोरटे हिरावाडी परिसरातीलच असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच अशाच पद्धतीने काही दिवसांपूर्वी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील टाकळी रोडवर सराफी दुकान फोडणारे चोरट्याचे वर्णन व गुन्ह्याची पद्धत एकसारखी असल्याचे आढळून येते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस