शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

..ते निघाले आहेत निफाड येथून राजस्थानला पायी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:18 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थान राज्यातून मोठ्या संख्येने कारागीर, कामगार, मजूर व छोटे व्यावसायिक आले होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन आणि संचारबंदी लागू केल्याने सर्व बाजारपेठा ठप्प झाल्या तर सर्वच व्यवसायही थांबल्याने या कारागीर, कामगार-मजुरांनी मूळगावी परत पायी जाण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे.

येवला : पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थान राज्यातून मोठ्या संख्येने कारागीर, कामगार, मजूर व छोटे व्यावसायिक आले होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन आणि संचारबंदी लागू केल्याने सर्व बाजारपेठा ठप्प झाल्या तर सर्वच व्यवसायही थांबल्याने या कारागीर, कामगार-मजुरांनी मूळगावी परत पायी जाण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे.निफाड येथीलही राजस्थानच्या चार युवा मजुरांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला असून, ते येवलामार्गे रवाना झाले आहेत.संचारबंदीच्या सुरुवातीस ज्यांना शक्य होते त्यांनी आपले घर जवळ केले. मात्र जे थांबले त्यांची पंचाईत झाली आहे. हाताला काम नाही, रस्त्यावर यायचे नाही. परिणामी खिशात पैसा नसल्याने घरात बसून उपासमारी सहन करण्यापलीकडे दुसरा पर्याय राहिला नाही.संचारबंदीमुळे प्रवासासाठी सार्वजनिक व खासगी वाहन व्यवस्थाही नसल्याने राजस्थान राज्यातून आलेल्या गारेगार विक्री करणाऱ्या चार युवकांनी राजस्थानच्या दिशेने पायी जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे पाचशे ते हजार किलोमीटरचे अंतर ते कसे गाठतील हा प्रश्न संवेदनशील मनाला न पडला तर नवलच!निफाड येथे गारेगार विकणाºया एका मालकाने राजस्थानातील चार युवकांना गारेगार, आइस्क्र ीम विक्रीसाठी आणले होते. मागील महिन्यात तो मालक लग्नकार्यासाठी राजस्थानात गेला. मात्र, देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे मालकाला राजस्थानमधून महाराष्ट्रात येता येईना. त्याचदरम्यान लॉकडाउन व संचारबंदीही लागूत्यामुळे रोजगार बुडाला. खिशात पैसे नाही आणि मालकाकडूनही पैसे येईनात. यामुळे या तरुणांनापायी घरी परत जाण्याचा मार्ग स्वीकारला. रस्त्याने जे पदरात पडेल त्याने तहान-भूक भागवत हे तरुण राजस्थानकडे निघाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य