शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांमध्ये होणार 'थर्मल गन'ने तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 20:47 IST

शासकीय कार्यालयातील सर्व खिडक्या पुर्णपणे उघडाव्या, कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांमध्ये किमान तीन फूट अंतर असावे त्यासाठी आवश्यक असेल तर कार्यालयातील बैठक व्यवस्थेत फेररचना करावी, कार्यालयात येणा-या अभ्यागतांना मास्क असणे अनिवार्य करण्यात यावा, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची तसेच प्रत्येक स्वच्छतागृहात साबण, हॅण्डवॉशची व्यवस्था करावी

ठळक मुद्देअनेक व्यक्तींना एकत्र न बोलविता लहान गट करावेतहाय रिस्क, लो रिस्कची यादी तयार करावी

नाशिक : सर्वच शासकीय कार्यालये नियमितपणे सुरू झाली असून, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने शासकीय कार्यालयांसाठी काही उपाययोजना सुचविल्या असून, त्यात प्रामुख्याने प्रत्येक अधिकारी, कर्मचारी व अभ्यागतांचे तपमान दररोज थर्मल स्कॅनरने तपासूनच प्रवेश देण्याबरोबरच प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.या संदर्भात शासनाने सुचविलेल्या उपाययोजनांमध्ये शासकीय कार्यालयातील सर्व खिडक्या पुर्णपणे उघडाव्या, कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांमध्ये किमान तीन फूट अंतर असावे त्यासाठी आवश्यक असेल तर कार्यालयातील बैठक व्यवस्थेत फेररचना करावी, कार्यालयात येणा-या अभ्यागतांना मास्क असणे अनिवार्य करण्यात यावा, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची तसेच प्रत्येक स्वच्छतागृहात साबण, हॅण्डवॉशची व्यवस्था करावी, कार्यालयात नियमित वापर करण्यात येणा-या वस्तू दिवसातून तीन वेळा स्वच्छ पुसून घ्यावेत. कार्यालयातील संगणक, प्रिंटर, स्कॅनर दिवसातून दोन वेळा स्वच्छ पुसून घ्यावेत या वस्तुंचे निर्र्जंतूकीकरण ७० टक्के अल्कहोल असलेल्या सॅनिटायझरने करण्यात यावे, कार्यालय नियमितपणे साबण व पाण्याने स्वच्छ धुवून घेण्यात यावे.कार्यालयाच्या वापराबरोबरच कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घ्यायवयाच्या खबरदारीबाबतही शासनाने मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. त्यात एकाच वाहनातून अनेक अधिकारी, कर्मचाºयांनी प्रवास करू नये, ई-आॅफिसचा जास्तीत जास्त वापर करावा, फाईल्स ई-मेलद्वारे पाठवाव्या, कमीत कमी अभ्यागतांना कार्यालयात प्रवेश द्यावा, कार्यालयीन बैठकीसाठी अधिकारी, कर्मचा-यांना प्रत्यक्ष बोलवूनये त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरसिंगचा वापर करावा, एकाच कामासाठी अनेक व्यक्तींना न एकत्र न बोलविता दोन-तीन व्यक्तींचे लहान गट करावेत.कार्यालयीन सर्व प्रकारच्या खबरदारी घेवूनही जर कार्यालयातील कर्मचारी, अधिका-याला संसर्ग झाल्यास काय उपायोजना योजाव्यात त्याबाबतही शासनाने मार्गदर्शन केले आहे. त्यात ताप १००.४ डिग्रीपेक्षा अधिक असल्यास त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल करावे, अहवाल पॉझिटिव्ह आल्यास कर्मचारी, अधिकाºयास १४ दिवस कार्यालयात येवू देवू नये, अशा कर्मचारी, अधिका-याचा संपर्क आलेल्यांची हाय रिस्क, लो रिस्कची यादी तयार करावी व त्याबाबत खबरदारी घ्यावी अशा सुचनाही करण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिकTemperatureतापमान