शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात कुठलीही उणीव भासणार नाही, नाशिककरांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा - छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 21:00 IST

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in Nashik : कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथील मुख्य सभामंडपाच्या कामाची, किचन, भोजन व्यवस्था, प्रमुख पाहण्यासाठी उभारण्यात आलेल्या रूमची मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली.

नाशिक : कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटीआडगाव नाशिक येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जवळपास  पूर्ण झाली आहे. काल झालेल्या पावसामुळे कुठलाही व्यत्यय निर्माण झालेला नाही. सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात कुठलीही उणीव भासणार नाही. त्यामुळे नाशिककरांनी संमेलन स्थळी येऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले.

कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथील मुख्य सभामंडपाच्या कामाची, किचन, भोजन व्यवस्था, प्रमुख पाहण्यासाठी उभारण्यात आलेल्या रूमची मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी संमेलन समन्वयक माजी खासदार समीर भुजबळ, हेमंत टकले, कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, प्रा. डॉ.शंकर बोऱ्हाडे, दिलीप खैरे, समाधान जेजुरकर, अमर वझरे यांच्यासह समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून सारस्वतांच्या स्वागतासाठी कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी ही पूर्णपणे सजली आहे. पावसाचे वातावरण जरी असले तरी संपूर्ण काळजी घेत संमेलनाच्या सर्व कार्यक्रमाची अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले आहे. हे संपूर्ण नाशिककरांचे संमेलन असून नाशिकचं नाव जागतिक पातळीवर पोहचण्यासाठी आपण या संमेलनाच्या नियोजनात कुठलीही उणीव भासणार नाही याची परिपूर्ण काळजी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसामुळे संमेलनाच्या कुठल्याही कार्यक्रमात व्यत्यय येणार नाही. नाशिककरांना विनंती आहे की, नाशिकमध्ये देशभरातून येणाऱ्या पाहुण्यांचे उचित स्वागत करा असे सांगत नाशिककरांनी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी येऊन या अभूतपूर्व संमेलनाचा आनंद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. संमेलनासाठी सर्व नागरिकांना प्रवेश खुला असून सर्व सोयी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनChagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिक