शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भीती होतीच, पण सुदैवाने धोका टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 01:16 IST

चीनचे २०१६ पासून अनियंत्रित झालेले अवकाश प्रयोगशाळेचे यान अरबी समुद्रात कोसळणार अशी भीती भारतासह जगभरातील विविध देशांना वाटत होती. त्यामुळे भारतावर या चिनी अवकाश प्रयोगशाळा यानाचा धोका होताच; मात्र तो सुदैवाने टळला. हे यान अरबी महासागरात कोसळणार अशी भीती व्यक्त केली जात होती; मात्र यानाचा अवकाशात स्फोट होऊन त्याचे तुकडे उल्का वर्षावाप्रमाणे प्रशांत महासागरात कोसळले.

अपूर्वा जाखडी ।चीनचे २०१६ पासून अनियंत्रित झालेले अवकाश प्रयोगशाळेचे यान अरबी समुद्रात कोसळणार अशी भीती भारतासह जगभरातील विविध देशांना वाटत होती. त्यामुळे भारतावर या चिनी अवकाश प्रयोगशाळा यानाचा धोका होताच; मात्र तो सुदैवाने टळला. हे यान अरबी महासागरात कोसळणार अशी भीती व्यक्त केली जात होती; मात्र यानाचा अवकाशात स्फोट होऊन त्याचे तुकडे उल्का वर्षावाप्रमाणे प्रशांत महासागरात कोसळले. चीनने जगाला दाखविण्यासाठी २०११ मध्ये अवकाशात स्वतंत्ररीत्या साडेआठ टन वजनाची अवकाश प्रयोगशाळा २७० कोटी रुपये खर्च करून धाडले होते. अवकाश यान प्रयोगशाळा २०११ ते २०१५ पर्यंत योग्यरीत्या कार्यान्वित होती; मात्र अचानकपणे २०१६ पासून या यानाचे संपर्क चायनीज स्पेस एजन्सीसोबत पूर्णत: संपुष्टात आले. चीनच्या वैज्ञानिकांनी ही गंभीर बाब त्यांच्या एजन्सीने जगापासून लपविली.  मात्र ही बाब नासा, इसा या अंतराळ संस्थांच्या वैज्ञानिकांच्या लक्षात आली. त्यानंतर वैज्ञानिकांनी यानाला ट्रॅकिंग करण्यास सुरुवात केली. परंतु हे यान ट्रॅक होत नव्हते कारण पृथ्वी स्वत: व सूर्याभोवती फिरत असल्यामुळे ते अवघड होत होते आणि अवकाशात भरकटलेल्या यानाचे योग्य लोकेशन मिळत नव्हते. त्यामुळे भारतासह न्यूझीलंड, युरोप, ब्रिटन अशा सर्वच देशांना ते आपल्या हद्दीत कोसळण्याची भीती वाटत होती. या यानाचे वजन सुमारे साडेआठ टन इतके होेते. चीनने अवकाशात सोडलेल्या चीन प्रयोगशाळेचे नाव ‘पॅँगॉँग-१ चायनिज स्पेस स्टेशन’ असे दिले होते. हे यान २०१६पासून संपूर्णत: भरकटलेले होते. या यानावर कुठल्याही प्रकारे कोणाचेही नियंत्रण नव्हते. नियंत्रणाबाहेर यान झाल्याची जाणीव चायनिज स्पेस एजन्सीच्या वैज्ञानिकांना होती. जगापुढे आपले अपयश उघड होईल, या भीतीपोटी ही माहिती चीनकडून उघड करण्यात आली नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून हे यान अनियंत्रीत होऊन अवकाशात भरकटत होते. यान कधीही पृथ्वीवर कोसळू शकते, याची शक्यता होती. या दिशेने नासा, इसा या अंतराळ संस्थांसह भारताच्या इस्त्रोच्या वैज्ञानिकांनीही संशोधन सुरू ठेवत यान भारताच्या हद्दीत कोसळणार नाही, असा निष्कर्ष लावला होता. सोमवारी पहाटे चिनी प्रयोगशाळेचे यान अवकाशात जळाले आणि त्याचे तुकडे प्रशांत महासागरात पडले. यामुळे सागरी जैवविविधतेला काही प्रमाणात हानी पोहचली, मात्र पृथ्वीवरील वातावरणात त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही.- लेखक नासाच्या स्पेस एज्युकेटर आहेत

टॅग्स :NASAनासा