शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितींसाठी मतदार याद्यांचा घोळ अद्याप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:37 IST

बागलाण तालुक्यातील सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा घोळ अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे निवडणूक यंत्रणेला सोमवारी (दि.१२) जाहीर केलेल्या मुदतीत अंतिम यादी प्रसिद्ध करता आली नाही. या घोळामुळे निवडणूक प्रक्रि या लांबण्याची शक्यता आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यातील सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा घोळ अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे निवडणूक यंत्रणेला सोमवारी (दि.१२) जाहीर केलेल्या मुदतीत अंतिम यादी प्रसिद्ध करता आली नाही. या घोळामुळे निवडणूक प्रक्रि या लांबण्याची शक्यता आहे. तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाने जानेवारी महिन्यात मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा कार्यक्र म जाहीर करून निवडणुकीचे बिगुल वाजविले. मात्र प्रथमच शासनाने प्रत्येक शेतकºयाला मतदानाचा अधिकार बहाल करून ऐतिहासिक निर्णय घेतला; परंतु हा निर्णय घेताना आवश्यक मार्गदर्शन नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून मतदान याद्यांचा घोळ कायम होता. गेल्या महिन्यात गणरचना जाहीर करून आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानंतर हरकतींचा अक्षरश: पाऊस पडला होता. सटाणा बाजार समितीत तब्बल २६४ हरकती नोंदविल्या गेल्या त्यापैकी १६ हरकती फेटाळण्यात आल्या. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाºयांनी १२ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्र म जाहीर केला होता. त्यानंतर पंधरा दिवसांनी निवडणूक कार्यक्र म जाहीर करण्याचे संकेत दिले होते; मात्र कोणत्या शेतकºयांना मतदानाचा हक्क बहाल करायचा याबाबत शासनाकडून मुदतीत मार्गदर्शन न आल्याने जाहीर केल्यानुसार सोमवारी (दि.१२) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे आवश्यक होते. मात्र मतदार याद्यांचा घोळ अद्याप मिटलेला नाही.सामाईक उताºयाचा तिढा सुटलाजानेवारी महिन्यात तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यामध्ये सामाईक सातबारा उताºयावरील सर्वच शेतकºयांना वगळण्यात आले होते. त्यामुळे शासनाविरु द्ध कमालीची नाराजी पसरली होती. यामुळे पणनने दखल घेऊन सामाईक सातबारा उताºयावरील पहिल्या क्र मांकाच्या नावाला मतदानाचा हक्क बहाल करावा, असे आदेश राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाला दिले होते; मात्र यावर शेतकºयांनी आक्षेप घेतला होता. त्यावर सुनवाई झाली़ सामाईक सातबारा उताºयावरील प्रत्येक शेतकºयाच्या वाट्याला कमीत कमी दहा गुंठे क्षेत्र येईल अशा सामाईक उताºयावरील शेतकºयांनाच मतदानाचा हक्क मिळणार आहे. एखाद्या उताºयावर सहा जणांची नावे असतील आणि क्षेत्र ५९ गुंठेच असेल, तर एकाही शेतकºयाला मतदानाचा हक्क राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एकंदरीत सामाईक उताºयावरील नावांचा तिढा सुटला असला तरी या निर्णयामुळे बहुतांश अल्पभूधारक शेतकरी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार आहेत.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डElectionनिवडणूक