शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दंतोपचारांना विम्याचे कवच अद्याप नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 01:04 IST

भारतीय विमा नियामक प्राधिकरणने दंतोपचारांना आरोग्य विम्यात समाविष्ट करावे, याबाबत सूचना केल्या असल्या तरी अद्याप विम्या कंपन्यांच्या मुख्यालयात याबाबत कुठल्याही हालचाली नसल्याने विमा ग्राहकांना या उपचारांच्या खर्चाबाबत विम्या कंपन्यांची मदत सध्यातरी मिळणार नसल्याचे दिसून येत आहे.

नाशिक : भारतीय विमा नियामक प्राधिकरणने दंतोपचारांना आरोग्य विम्यात समाविष्ट करावे, याबाबत सूचना केल्या असल्या तरी अद्याप विम्या कंपन्यांच्या मुख्यालयात याबाबत कुठल्याही हालचाली नसल्याने विमा ग्राहकांना या उपचारांच्या खर्चाबाबत विम्या कंपन्यांची मदत सध्यातरी मिळणार नसल्याचे दिसून येत आहे.  २८ आॅगस्ट रोजी आयआरडीए अर्थात भारतीय विमा नियामक प्राधिकरण यांनी विमा कंपन्यांना याबाबत सूचना केल्या होत्या. खर्चाचा आकडा जास्त असल्याने उपचार लांबणीवर टाकलेल्या विमा ग्राहकांना या निर्णयाने दिलासा वाटला होता. मात्र आॅक्टोबर संपत आला तरी याबाबत विमा कंपन्यांना त्यांच्या मुख्यालयांमधून याबाबत कुठलीही सूचना मिळालेली नाही. त्यामुळे ग्राहकांनाही तशीच उत्तरे दिली जात आहेत. विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना याविषयी विचारले असता, मुख्यालयांमध्ये याबाबत सविस्तर नियोजन सुरू असून, लवकरच त्याबाबतचे धोरण जाहीर केले जाणार असल्याचे उत्तर ऐकायला मिळत आहे. बहुतांशी आरोग्य विमा कंपन्यांची मुख्यालये ही चेन्नई, कोलकाता, चंदीगढ, हैदराबाद आदी ठिकाणी आहेत.  महाराष्टतील ग्राहकांना याबाबत पाठपुरावा करणे शक्य नसल्याने स्थानिक कार्यालयांमध्येच विचारणा करत ते निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. दंतोपचाराबरोबरच वंध्यत्व निवारण उपचार, स्टेमसेल, मानसोपचार यांचाही समावेश करावा, अशा सूचना आहेत. मात्र अद्याप याबाबत कुठलीही स्पष्टता नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य