शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
2
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचे अपघाती निधन; बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट
3
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
4
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
5
“ठाकरेंना सांगा की लगेच १ लाख पाठवा”; फडणवीसांचे उत्तर, या पैशांचे काय करणार? तेही सांगितले
6
IND vs NZ : आधी हळू चेंडू टाकला मग वेग पकडला! दोन्ही सलामीवीरांचा हर्षित राणानं केला ‘करेक्ट कार्यक्रम'
7
सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार! २०३० मध्ये १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील? तज्ज्ञांचा इशारा
8
'ऑस्ट्रेलियन सुंदरी' एलिस पेरीने खरंच बाबर आझमला प्रपोज केलं? जाणून घ्या Viral Photoचे सत्य
9
‘ठाकरे अजूनही १० मिनिटांत मुंबई बंद करू शकतात…’, संजय राऊतांचं मोठं विधान
10
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; 43व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
12
'X'वर अश्लील कंटेंट विरोधात अ‍ॅक्शन, ६०० अकाउंट डिलीट; मोदी सरकारच्या इशाऱ्यानंतर, इलॉन मस्क यांची कारवाई
13
महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?
14
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
15
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
16
बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड!
17
‘गझनीपासून औरंगजेबापर्यंत इतिहासात गडप झाले, पण सोमनाथ…’, मोदींचं मोठं विधान
18
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
19
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही चुकीला माफी नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:14 IST

महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुधारण्याची संधी न देता त्यांच्याविरुद्ध थेट निलंबनाची कारवाई केली जात असल्याबद्दल विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाºयांनी बुधवारी (दि.४) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा केली. यावेळी, नियमात राहूनच कारवाई केली जात असून चुकीला माफी नाही, अशी भूमिका आयुक्तांनी घेत पदाधिकाºयांना बोल सुनावले. मात्र, कामगार संघटनांच्या पदाधिकाºयांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत आपली आंदोलनाची उपसलेली तलवार म्यान केली.

नाशिक : महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुधारण्याची संधी न देता त्यांच्याविरुद्ध थेट निलंबनाची कारवाई केली जात असल्याबद्दल विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाºयांनी बुधवारी (दि.४) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा केली. यावेळी, नियमात राहूनच कारवाई केली जात असून चुकीला माफी नाही, अशी भूमिका आयुक्तांनी घेत पदाधिकाºयांना बोल सुनावले. मात्र, कामगार संघटनांच्या पदाधिकाºयांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत आपली आंदोलनाची उपसलेली तलवार म्यान केली.  तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रशासकीय शिस्त लावण्यासाठी कठोर निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. कामचुकार, कर्तव्यात कसूर करणाºया कर्मचारी-अधिकाºयांवर थेट निलंबनाची कारवाई केली जात आहे. सफाई कामात कुचराई करणाºयांवरही कारवाईचा बडगा उगारलेला आहे. या साºया पार्श्वभूमीवर महापालिकेतील सर्व कामगार संघटनांनी एकत्र येत आयुक्तांविरुद्ध आंदोलन उभे करण्याची तयारी केली. तत्पूर्वी, बुधवारी (दि.४) आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेत सर्व कामगार संघटनांच्या संघर्ष कृती समितीने चर्चा केली. यावेळी, महापालिकेत अधिकारी व कर्मचारी यांचे कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेण्यात येत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच अधिकारी व कर्मचाºयांकडून अनवधानाने चुका होत असतात. त्यामुळे त्यांना सुधारणेची संधी देण्यात यावी. मात्र, प्रशासनाकडून निलंबन, वेतनरोखी यांसारखी शास्ती केली जात असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत देण्यात आलेल्या नोटिसा व कारवाई मागे घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आयुक्तांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत चुका करणाºयांना माफी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. अनवधानाने चूक झाली असेल तर त्याबाबत समज दिली जाणार असल्याचे सांगितले. याशिवाय, कर्मचाºयांकडून चांगल्या कामाचीही अपेक्षा केली. म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे प्रवीण तिदमे, सफाई कामगार संघटनेचे सुरेश दलोड, सुरेश मारू, अनिल बेग, अनिल बहोत, माजी महापौर अशोक दिवे उपस्थित होते.शिस्त आवश्यकचबैठकीनंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, जे लोक चुका करतील, त्यांच्यावर कारवाई होणारच. किरकोळ चूक असेल तर त्याबाबत समज देऊन सोडून देता येईल. परंतु, कामकाजात शिस्त असलीच पाहिजे. पंचवटी विभागीय अधिकाºयाचे निलंबन हे कोणत्या कारणासाठी झाले, याची माहिती कर्मचारी संघटनांनी घेतलेली नाही. सेवानिवृत्तीला आलेले दिवस पाहून कारवाई होत नसते तर चुकीच्या कामकाजानुसार कारवाईचे स्वरूप ठरत असते. पंचवटी विभागीय अधिकाºयाकडून १ लाख ७ हजाराचा घोटाळा निदर्शनास आल्याने कारवाई झाली आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे