शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

पाऊस पडण्याची लक्षणे दिसत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 19:03 IST

खर्डे : जून महिना निम्म्यावर आला तरी देवळा भागात व तालुक्यात अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही व सध्या पाऊस पडण्याची कोणतीच लक्षणे दिसत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देदेवळा तालुका खरीप नियोजन पूर्ण, मका क्षेत्रात लक्षणीय वाढीचे संकेत

खर्डे : जून महिना निम्म्यावर आला तरी देवळा भागात व तालुक्यात अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही व सध्या पाऊस पडण्याची कोणतीच लक्षणे दिसत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.खरीप हंगामासाठी येथील शेतकरी सज्ज झाला आहे. नांगरणी, शेणखत टाकणे, बांध घालणे आदी कामे पूर्ण झाली आहेत. परंतु पाऊस हुलकावणी देत आहे. यावर्षीचा उन्हाळा तीव्र उन्हाने व गरमीने असह्य झाला होता. त्यामुळे शेतकरयांसह नागरिकही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. इतर भागात रोहिणी नक्षत्रात पाऊस झाल्याने तेथील खरीप हंगामपूर्व मशागती सुरू झाल्या आहेत.पण येथे पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना काम सुचेनासे झाले आहे. अति उष्णतेमुळे चाळीत साठवलेला कांदा खराब होऊ लागल्याने शेतकरी धास्तावले आहेत. मृग नक्षत्रातील पाऊस शेतीला फायदेशीर असतो, पण अद्याप पावसाने हजेरी न लावल्याने हे नक्षत्र कोरडे जाते की काय अशी भीती शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे. येथील बहुतांश शेतकरी खरीप हंगामात मका पिकाला पसंती देतात तर काही पावसाळी कांदा लावतात.देवळा तालुका खरीप नियोजन पूर्ण, मका क्षेत्रात लक्षणीय वाढीचे संकेततालुक्याचे खरीप हंगामाचे नियोजन पूर्ण झाले असून यंदा ३२ हजार ९०० हेक्टर क्षेत्रात खरपाची पेरणी होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून खते व बियाणांची उपलब्धता करून देण्यात आली आहे.सन २०१८/१९ च्या खरीप हंगामासाठी देवळा तालुका कृषी विभागाने खरीप क्षेत्रात होणाºया संभाव्य वाढी बरोबरच नैसर्गिक अस्थिरतेमुळे होणाºया लेट खरीप पेरणीचेही सूक्ष्म नियोजन केले आहे. नियोजनानुसार २५७५० हेक्टर क्षेत्रात तृणधान्य पेरणी होणार असून त्यासाठी ३५५५ क्वि. बियाणे लागणार आहे. कडधान्यांचा सर्वसाधारण क्षेत्रात ह्या वर्षी घट ग्राह्य धरण्यात आली असून ३२०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १८१० हेक्टर जमिनीवर पेरणी होणार आहे यासाठी विविध कडधान्याचे १६८.७५ क्वि. बियाणे लागणार आहे. गळीत धान्याच्या क्षेत्रात वाढ अपेक्षीत आहे. ९०० हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र आहे मात्र त्यात ५४० हे. ने वाढ होऊन १४४० हे. क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्टे आहे. यासाठी ११६५.९०५ क्वि. बियाणे शेतकºयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. खरीप कांदा ह्या क्षेत्रात ११०० हेक्टरने वाढ होऊन ४५०० हे. क्षेत्रात लागवड होणार असून त्यासाठी बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.चालू खरीप हंगामात मक्याच्या क्षेत्रात विक्र मी वाढीचे संकेत असून ३२ हजार ९०० हेक्टर क्षेत्रापैकी १६ हजार २५० हेक्टर जमीन ही मका पिकाच्या पेरणीखाली येणार असून त्याचे प्रमाण हे ऐकून खरीप पेरणीच्या पन्नास टक्के इतके आहे. त्यासाठी ३२.५० क्वि. बियाणे उपलब्ध आहे.- सचिन देवरे,तालुका कृषी अधिकारी, देवळा.