शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनांमध्येच संघटन नाही

By admin | Updated: November 22, 2015 00:02 IST

विष्णुपंत ताकाटे : पेन्शनधारकांचा मेळावा

 पिंपळगाव बसवंत : शेतकऱ्यांना ‘संघटीत’ करण्यासाठी अनेक संघटना जन्माला आल्या, परंतू या संघटनांमध्येच ‘संघटन’ नाही तर ते शेतकऱ्यांना काय न्याय मिळवून देणार, अशी टीका करत शरद जोशी यांच्या विचाराचा आदर्श ठेऊन अमलबजावणी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते विष्णूपंत ताकाटे यांनी केले.निफाड तालुका ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने कारसूळ (ता. निफाड) येथे शनिवारी पेन्शनधारकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ताकाटे म्हणाले, ‘लाख मेले तरी चालतील पण जगाचा पोशिंदा जगला पाहिजे’ असे म्हटले जाते. परंतू, हा पोशिंदा जगविण्यासाठी सरकार प्रयत्नच करत नसल्याची टीका ताकाटे यांनी केली.आयटकचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले म्हणाले, सरकारने सातवा वेतन आयोग लागू केला असला तरी त्याचा फायदा फक्त आठ टक्के लोकांना होणार आहे. तर ९२ टक्के लोकांना त्याचा काडीमात्रही फायदा नाही, असे प्रतिपादन आयटकचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले यांनी केले. देसले म्हणाले, सेवानिवृत्त कामगारांना जोपर्यंत पेन्शन मिळत नाही तोपर्यंत आपला लढा असा सुरू राहील. निवृत्तीनंतर पेन्शनधारकांना जगण्यासाठी किमान साडेसहा हजार रु पये मिळावेत, अशी मागणी असतानाही शासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे जगभरात एकमेव पेन्शनधारक आहेत की, ज्यांना पेन्शनच्या पैशांवर महागाई भत्ता मिळत नाही. जमा रकमेवरील व्याजाची रक्कम तर दूरच; पण साधी पेन्शनमधील वाढही शासनाला मान्य नसेल तर यापेक्षा दुर्दैव नाही, असा आरोप देसले यांनी सरकारवर केला.आयटकचे कार्याध्यक्ष सुभाष काकड यांनीही सरकारवर तोफ डागत पेन्शनधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी सरकारचे कपडे उतरवले जातील, असा इशारा दिला. जिल्हाध्यक्ष सुधाकर गुजराथी यांनी प्रकाश जावडेकरांनी पेन्शनधारकांची फसवणूक केल्याचे सांगत पेन्शनधारकांच्या जीवावर निवडणुका जिंकल्याचे नमूद केले. देशभरात एक हजार रूपयांपेक्षा कमी पेन्शन असलेल्यांची संख्या 57 लाख असताना त्यांना न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.आयटकचे उपाध्यक्ष बापू रांगणेकर आणि खिजनदार प्रकाश नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्र माचे मुख्य आयोजक निवृत्ती ताकाटे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून पेन्शनधारकांच्या व्यथा मांडल्या. त्यांनी सादर केलेली पेन्शनधारकांची कविता उपस्थितांना चांगली भावली. कार्यक्र म यशस्वीतेसाठी संजय जगताप यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार केला. सूत्रसंचालक शंखपाळ गुरूजी यांनी केले.मेळाव्याला ईपीएफ फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, सरपंच रामकृष्ण कंक, उपसरपंच देवेंद्र काजळे, सोसायटी चेअरमन हनुमंत शंखपाळ, पाणी वापर संस्थेचे भाऊसाहेब शंखपाळ, जिल्हा सचिव डी. बी. जोशी, कार्याध्यक्ष विलास विसपुते, संघटक चेतन पणेनर, उपाध्यक्ष नारायण आडणे, प्रवीण पाटील, खिजनदार प्रशांत देशमुख, सहसचिव एम. एन. लासुरकर, सुरेश कासार, भाऊसाहेब शिंदे, बळवंत जाधव यांच्यासह पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)कोट...सैनिकांना वन रँक वन पेन्शन देण्यासाठी सरकारने १० हजार कोटी रु पये खर्च केले आहे. आम्हाला तीन हजार रूपये पेन्शन व महागाई भवा देण्यासाठी १४ हजार कोटी खर्च येईल, असे सरकारचे म्हणणे आहे. परए आमचे 2 लाख कोटीहून अधिक रूपये सरकारकडे पडून आहेत मग अडचण कशाची आहे. इपीएफ १९९५ पेन्शनधारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी पीएफ कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.- राजू देसले, संस्थापक अध्यक्ष, आयटक