शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं याबाबत दुमत नाही : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 12:13 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशीच भूमिका माझी व माझ्या राष्ट्रवादी पक्षाचीसुध्दा आहे. महाविकास अघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचादेखील या मागणीला पाठिंबा असून सरकारकडून विविध प्रयत्नही करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमूक आंदोलनस्थळी मांडली भूमिकासंभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन

नाशिक : मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी वारंवार केली जात आहे. त्यांची मागणी रास्त असून आमचादेखील या मागणीला पुर्वीपासून पाठिंबा राहिलेला आहे. मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळाले पाहिजे याबाबत कोणाचेही दुमत नाही, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नाशिक शहरातील गंगापुररोडवरील मॅरेथॉन चौकामध्ये थोरात सभागृहाच्या प्रारंगणात छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन पुकारले आहे. सोमवारी (दि.२१) सकाळी नऊ वाजेपासून आंदोलनाला प्रारंभ झाला आहे. या आंदोलनस्थळी विविध लोकप्रतिनिधी हजेरी लावत आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. दरम्यान, ११वाजता भुजबळ यांचे आंदोलनस्थळी आगमन झाले. त्यांनी संभाजीराजे यांची भेट घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशीच भूमिका माझी व माझ्या राष्ट्रवादी पक्षाचीसुध्दा आहे. महाविकास अघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचादेखील या मागणीला पाठिंबा असून सरकारकडून विविध प्रयत्नही करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष, शिवसेनेसह सर्वांची हीच भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता या समाजालाही आरक्षणापासून वंचीत ठेवता कामा नये, असे भुजबळ म्हणाले. राज्य सरकार राज्याच्या पातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत; मात्र सर्वोच्च न्यायालयात घडणाऱ्या घडामोडींबाबत केंद्र सरकारनेसुध्दा अधिक गंभीरपणे खबरदारी घेणे क्रमप्राप्त ठरते. केंद्र सरकारने हस्तक्षेप करत कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी पुढाकार घेण्यास काय हरकत आहे, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.  याप्रसंगी कृषीमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार भारती पवार,  आमदार नितीन पवार, दिलीप बनकर, सुहास कांदे, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत आदि उपस्थित होते.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNashikनाशिकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा