नाशिक : भविष्य निर्वाह निधीचे खाते आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची मोहीम सध्या सुरू आहे; मात्र अनेकांकडे अद्याप आधारकार्ड नसल्याने ही सुविधा भविष्य निर्वाह निधी कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे.सातपूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयात सोमवार, दि. १ डिसेंबरपासून ही सुविधा उपलब्ध होत आहे. ज्या भविष्य निर्वाह निधीच्या सभासदांनी अद्याप आधारकार्ड काढले नसेल त्यांनी कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येताना सभासदांनी कंपनीने दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
आधारकार्ड नसल्याने ही सुविधा भविष्य निर्वाह निधी कार्यालयामध्ये उपलब्ध
By admin | Updated: December 1, 2014 01:14 IST