शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

आंदोलने खूप होताहेत, कोरोना संपला की काय?

By किरण अग्रवाल | Updated: October 4, 2020 01:22 IST

कोरोनाची आटोक्यात न येणारी स्थिती पाहता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेण्यात आली असताना व संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवरचे निर्बंध हटविले गेले नसताना राजकीय आंदोलनबाजी मात्र जोमात सुरू होऊ पाहते आहे. यातून साधणाऱ्यांचे राजकारण भलेही साधले जाईल; परंतु एखाद्याचा जीव गेला तर तो पुन्हा मिळवता येणार नाही हे सुजाणांनी लक्षात घ्यायला हवे. यासाठी सुरक्षितता राखण्याची व संसर्ग टाळण्याची गरज आहे.

ठळक मुद्दे‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ निभावण्याऐवजी राजकीय अजेंडे रेटण्याकडे राजकारण्यांचा कल....लोकल प्रश्न सोडून राष्ट्रीय विषयावर राजकारण... प्रत्येक व्यक्तीने, कुटुंबाने जबाबदारीने काळजी घेणे व सुरक्षितता बाळगणे गरजेचे

सारांश

अपवादाचा शिरस्ता पडू पाहतो तेव्हा भीड चेपल्याखेरीज राहात नाही. एकदा ती चेपली गेली, की भयाचे जोखड आपोआप उतरवून ठेवले जाते. कोरोनाच्या बाबतीतही तसेच काहीसे होते आहे. आगामी सणासुदीत त्याचा प्रकोप वाढलेला असेल, असे जरी सांगितले जात असले तरी आपले राजकीय अजेंडे रेटणाऱ्यांची आंदोलने धडाक्यात सुरू झाली आहेत. अभिव्यक्तीचा हक्क नाकारता येऊच नये; पण संसर्गाची फिकीर न बाळगता होणारी प्रदर्शने संकटाला निमंत्रण तर ठरत नाहीत ना, असा प्रश्न यातून नक्कीच उपस्थित व्हावा.

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी विधेयकाबाबत बरीच मतमतांतरे आहेत. त्याबाबत समग्र विचारमंथन घडून धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा असताना रस्त्यावरची पारंपरिक राजकीय आंदोलने सुरू झाली आहेत. अशातच उत्तर प्रदेशातील हाथरसमधील घटनेने पुन्हा निर्भयाच्या जखमा जाग्या करून दिल्या. अवघे समाजमन त्यामुळे पुन्हा पिळवटून निघणे स्वाभाविक ठरले. या घटनेप्रकरणी आंदोलन करणाºया काँग्रेस नेत्यांशी यूपी सरकारने गुंडागर्दीसारखा व्यवहार केला, परिणामी या विषयाला राजकीय फोडणी लाभून गेली. देशात हे जे काही असंवेदनशीलतेचे राजकारण बोकाळत चालले आहे त्यावर रोष व्यक्त होणे हे समाजाच्या सजगतेचे लक्षण म्हणायचे; पण या सर्वच बाबतीतले अभिव्यक्तीकरण सार्वजनिकपणे करण्यासारखी सध्याची वेळ नाही.

कोरोनाच्या संकटाने अजूनही आपली पाठ सोडलेली नाही. त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्राचा नंबर तर संपूर्ण देशात अव्वल आहे. त्यामुळे राज्य शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अशी जाणीव निर्माण करणारी मोहीम हाती घेतली आहे. हे संकट थोपवणे खरेच एकट्या शासकीय बळावर शक्य होणार नाही, त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने, कुटुंबाने जबाबदारीने काळजी घेणे व सुरक्षितता बाळगणे गरजेचे बनले आहे. अशावेळी वैचारिक व राजकीय मतभिन्नता काहीही असू द्या, परंतु सर्वांची प्राथमिकता अगोदर संकटापासून बचावणे हीच असायला हवी. व्यवस्था तोकड्या पडतात व साधनेही अपुरी ठरतात तेव्हा तर त्यातील गांभीर्य अधिकच वाढून जाते. अशात संसर्गाला निमंत्रण मिळून जाईल अशी कृती चुकूनही होणार नाही याची काळजी घेतली जाणे गरजेचे आहे; पण कोरोना संपला अशाच थाटात आता राजकीय आंदोलनांना व सार्वजनिक उपक्रमांना प्रारंभ झालेला दिसून येत आहे हे दुर्दैवी म्हणायला हवे.

यापुढील काळात कोरोनासोबतच जगायचे आहे हे खरेच, परंतु जाणतेपणी त्याची सोबत ठेवली जाणार असेल तर ते आत्मघातकीच ठरावे. आंदोलने पुकारून गर्दी जमवणारे नेते याबाबतीत बाधित झाले तर मोठ्या खासगी रुग्णालयात त्यांची व्यवस्था होऊन जाते; परंतु सामान्य कार्यकर्त्यावर तशी वेळ आली तर त्याचे जगणेच अवघड होऊन बसते हा यासंदर्भातला आजवरचा अनुभव आहे. ‘माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली तपासणी करून घ्यावी’, असे सोशल मीडियात आवाहन करून नेते हात वर करतात, कार्यकर्त्यांच्या पाठीशी अशावेळी नातलगही उभे राहताना दिसत नाही, ते बिचारे रुग्णालयाच्या चकरा मारूनच खचतात. तेव्हा ही वेळ आपले राजकीय अजेंडे रेटण्याची नाही हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे.

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांवर अनेकांचा डोळा आहे हे ठीक आहे; पण त्यासाठीची तयारी आतापासून अशी जीव धोक्यात घालून करायला नको. निवडणुका येतील व जातीलही, सत्ता आणि संधीही येईल-जाईल, पण गेलेला जीव परत येणार नाही. तेव्हा भान राखून सार्वजनिक उपक्रमातील सहभागिता निश्चित करा एवढेच यानिमित्ताने.

लोकल प्रश्न सोडून राष्ट्रीय विषयावर राजकारण...राष्ट्रीय कृषी विधेयकावर आदळआपट करताना नाशकात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मखमलाबाद परिसरात उभ्या राहू पाहणाºया योजनेस होणाºया शेतकºयांच्या विरोधावर मात्र फारसे काही कोणी बोलताना आढळत नाही. या प्रकल्पाचे समर्थकही काही आहेत; परंतु ज्या शेतकºयांची यासंदर्भात अडचण आहे त्यांना विश्वासात घेऊन किंवा त्यातील फायदे समजावून सांगण्याऐवजी केंद्रात व महापालिकेतही सत्ता आहे म्हणून रेटून नेले जाणार असेल तर त्याबाबत कोणी पुढे का येऊ नये? उलट यावरून सत्ताधारींमधली फूट पडता पडता टळली व एरव्ही आंदोलनबाजी करणारे मूग गिळून आहेत, याला काय म्हणायचे?

टॅग्स :PoliticsराजकारणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या