शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई नाक्यावर सिग्नल यंत्रणा नसल्याने हाल

By suyog.joshi | Updated: April 13, 2024 14:22 IST

महापालिकेने मुंबई नाक्याच्या सर्कलचा घेर कमी केल्यानंतर रस्ते प्राधिकरण विभागाने उड्डाणपुलाखाली द्वारकेकडे जाणारा रस्ता तयार केला.

नाशिक (सुयोग जोशी) : महापालिकेने मुंबई नाक्याच्या सर्कलचा घेर कमी केल्यानंतर रस्ते प्राधिकरण विभागाने उड्डाणपुलाखाली द्वारकेकडे जाणारा रस्ता तयार केला असला तरी सिग्नल यंत्रणाच नसल्याने सिडकाे, शहरातून तसेच तिकडून द्वारकासह भाभानगरकडून येणारी वाहने कोणत्याही मार्गाने मध्येच घुसत असल्याने वाहतुकीच्या कोंडीत भर पडली आहे. सिडकोकडून येणारी वाहने द्वारकेकडे जात असताना मध्येच कुठेतरी वळण घेत असल्याने अनेकवेळा किरकोळ अपघातांनाही सामोरे जावे लागत आहे. द्वारका चौकात सहा बाजूने वर्दळ असल्याने तेथे असलेल्या सिग्नलच्या धरतीवर मुंबई नाका येथे सिग्नल बसविण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. एकूण पाच सिग्नल मुंबई नाका येथे बसविले जाणार आहेत.

द्वारका परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प होत असल्याने या भागात सर्व्हिस रोडसह राष्ट्रीय महामार्गावरदेखील सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. एका सिग्नलचा कालावधी जवळपास दोन मिनिटे असल्याने वाहनधारकांना सिग्नलवरून गाडी बाहेर काढताना विलंब होत असला तरी वाहतुकीचे नियोजन मात्र व्यवस्थित होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबई नाका सर्कलवरही सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असली तरी ती कधी बसवणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.असे राहतील सिग्नल-

द्वारका भागातून मुंबई नाक्याकडे येताना पहिला सिग्नल राहील. हा सिग्नल सुटल्यानंतर सर्व्हिस रस्त्यावरील सिग्नलही सुटेल. दुसरा सिग्नल मुंबई नाक्याकडून द्वारका भागाकडे येणारा असेल. तिसरा सिग्नल हा भाभानगर बाजूने राहील. मुंबई नाका मार्गे हा सिग्नल राहील. चौथा सिग्नल हॉटेल साहेबांसमोर राहील, तर पाचवा सिग्नल अतिरिक्त म्हणून ठेवला जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकTrafficवाहतूक कोंडी