शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हा बाबा सकाळी-सकाळी शपथ घेतो म्हणजे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 17:35 IST

अजित पवार यांची मिश्किली : शपथविधीची ‘ती’ आठवण झाली ताजी

ठळक मुद्दे कादवा इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

नाशिक : मी एवढ्या थंडीत सकाळी-सकाळी कार्यक्रमाला आलो. तुमची झोप मोडली. त्याबद्दल क्षमा मागतो. मी एवढ्या सकाळी कार्यक्रमाला येईल की नाही, याबाबत एकाने शंका व्यक्त केली. पण दुसरा त्याला म्हणाला,अरे हा बाबा सकाळी सकाळी शपथ घेतो, तेव्हा आपल्या कार्यक्रमाला येईलच, अशी मिश्किली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे शाळा इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केली आणि उपस्थितांना फडणवीस-पवार यांनी भल्या पहाटे घेतलेल्या शपथविधीची आठवण पुन्हा ताजी झाली. कर्मवीर रा.स. वाघ संस्था संचलित कादवा इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले.यावेळी पवार म्हणाले, शासनाने दोन लाख रूपयांपर्यंत पीक कर्ज माफीचा निर्णय घेतला आहे. त्यापेक्षा अधिक असलेले कर्ज माफ करण्यासंदर्भात होत असलेली मागणीही रास्त आहे. त्यासाठी शासनाने समिती नेमली असून नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान व दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांना दिलासा देण्याची योजना आखली जात आहे. मात्र, त्यात काही कर्ज रक्कम भरण्याची तयारी ठेवा, असे स्पष्ट करत सरसकट कर्जमाफी होणार नसल्याचेही त्यांनी संकेत दिले.सरकार पूर्णवेळ टिकणारतीन पक्ष जरी वेगळ्या विचारसरणीचे असले तरी राज्याच्या हितासाठी ते एकत्र आले असून हे जनतेचे सरकार आहे. ग्रामीण व शहरी दोन्ही क्षेत्राच्या विकासासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे. मात्र काहीजण या सरकारबद्दल विसंवाद, वाद-विवाद असल्याच्या बातम्या पसरवत आहे, पण त्यात काहीही तथ्य नाही. शरद पवार, सोनिया गांधी व उद्धव ठाकरे हे सरकार टिकविण्यासाठी सक्षम असून हे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार व जनतेच्या अपेक्षाही पूर्ण करणार, असे पवार यांनी ठासून सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकAjit Pawarअजित पवार