शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरीचा सिलसिला सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:44 IST

शहर परिसरातील सीबीएस व मुंबई नाका परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकरोड येथून दुचाकी लंपास करण्यात आली होती. तसेच सरकारवाडा पोलिसांच्या हद्दीतूनही काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या.

नाशिक : शहर परिसरातील सीबीएस व मुंबई नाका परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे.मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकरोड येथून दुचाकी लंपास करण्यात आली होती. तसेच सरकारवाडा पोलिसांच्या हद्दीतूनही काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घटना घडल्या आहेत. शहरात दुचाकी चोरीचा सिलसिला सुरूच असल्याने नाशिककरांना रस्त्यावर वाहनेउभी करणेदेखील धोक्याचे झाले आहे.पहिल्या घटनेत सोमनाथ हरिभाऊ पिंगळे (रा. देवी मंदिराजवळ, मखमलाबाद) यांची ४० हजार रु पयांची प्लेझर (एम.एच. १५ सीपी ४२२२) सीबीएसजवळील भुयारी मार्गाच्या वाहनतळामधून अज्ञात चोरट्यांनी पळवूननेली. तसेच दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी द्वारका येथील नासर्डी पुलाजवळ असलेल्या बनकर मळा भागातील सोसायटीच्या वाहनतळातून ४० हजार रु पयांची पॅशन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली आहे.येथील झेप अपार्टमेंटमध्ये स्वप्नील रमेश वारे हे राहतात. त्यांनी त्यांच्या सोसायटीच्या वाहनतळात दुचाकी (एम.एच.१५ बीझेड १५१३) नेहमीप्रमाणे उभी केली होती.शहर व परिसरात दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ही टोळी शोधून काढावी, असे आवाहन केले जात आहे. शहरातून राजरोसपणे इमारतींच्या वाहनतळातून तसेच गजबजलेल्या परिसरातून दुचाकी पळवून नेल्या जात असताना पोलिसांकडून जुगारी शोधून त्यांच्यावर थातूरमातूर कारवाई केली जात आहे.घरफोडीत ३९ हजारांचा ऐवज लंपासनाशिक : सातपूर कॉलनीतील बळवंतनगर भागात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत घरामधून ३९ हजार रु पयांचा मुद्देमाल लांबविला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील आनंदछाया सहकारी गृहनिर्माण सोसायटीत भानुदास जगन्नाथ महांगडे हे राहतात.या आठवड्यात त्यांचे बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातून ३० हजार रु पयांच्या सोन्याच्या अंगठ्या, आठ हजार रु पयांचे चांदीचे कमरपट्टे, चांदीची थाळी, वाळा, एक हजार रुपयाची रोकड असा ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे त्यांनी फिर्यादित म्हटले आहे.याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी