शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आर्मी हद्दीतून चंदन वृक्षाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 18:19 IST

नाशिक : शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकलहरारोडवरील रेल्वे ट्रॅक्शन परिसरातील पाच चंदनाची झाडे तोडून सुवासिक खोड चोरून नेल्याच्या घटनेस आठ दिवस होत नाही तोच चोरट्यांनी आर्मीच्या हद्दीतील चंदनाचे झाड तोडून सुवासिक खोड चोरून नेल्याची घटना घडली आहे़

ठळक मुद्देचंदन चोरट्यांनी धुमाकूळ

नाशिक : शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकलहरारोडवरील रेल्वे ट्रॅक्शन परिसरातील पाच चंदनाची झाडे तोडून सुवासिक खोड चोरून नेल्याच्या घटनेस आठ दिवस होत नाही तोच चोरट्यांनी आर्मीच्या हद्दीतील चंदनाचे झाड तोडून सुवासिक खोड चोरून नेल्याची घटना घडली आहे़

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात बाळासाहेब बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (दि़१६) सकाळच्या ७ वाजेच्या सुमारास ते पेट्रोलिंग ड्युटी संपवून जात होते़ त्यावेळी ईएमई वर्कशॉप ईगल कॅन्टीनजवळील आर्मी हद्दीतील रस्त्याच्या कडेस असलेले चंदनाचे झाड चोरट्यांनी बुडापासून तोडून तीन फूट लांबीचा व दहा इंच व्यासाचा सुवासिक भाग चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले़

याप्रकरणी बोडके यांच्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिकरोडला वीजमीटरची चोरीनाशिक : नाशिकरोडच्या द्वारकानगरमधील रहिवासी सुनील परदेशी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन विद्युत मोटारींसह विजेचे मीटर चोरून नेल्याची घटना घडली आहे़ ७ आॅगस्ट ते १४ आॅगस्ट या कालावधीत ही घटना घडली असून, याप्रकरणी परदेशी यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

शिंदेगावातील इसमाची आत्महत्यानाशिक : शिंदेगावातील गौतमनगर येथील रहिवासी संजय पांडूरंग जाधव (४९) यांनी घराजवळील पत्र्याच्या शेडच्या अँगलला लुगड्याच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

पंचवटीतून दुचाकीची चोरीनाशिक : इंदिरानगरमधील रहिवासी दीप कुलकर्णी यांची १५ हजार रुपये किमतीची बॉक्सर दुचाकी (एमएच १५, एटी २९२२) चोरट्यांनी गंगाघाट येथील रामसेतू पुलाजवळील पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

विषारी औषध सेवन करून युवकाची आत्महत्यानाशिक : पंचवटी उदय कॉलनीतील बावीस वर्षीय मोरेश्वर राजाराम इनामदार या तरुणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ शुक्रवारी (दि़१७) सायंकाळच्या सुमारास मोरेश्वर याने विषारी औषध सेवन केल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :NashikनाशिकCrimeगुन्हा