नाशिकरोड : मंगला एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यातुन मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची ४५ हजारांची रोकड, कागदपत्रे, असलेली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली. पश्चिम बंगालमधील शिवप्रसाद दत्ता हे मंगला एक्स्प्रेसने सोमवारी वातानुकूलित बी-१ या डब्यातून मुंबईला चालले होते. सकाळी नाशिकरोड रेल्वेस्थानक येण्यापूर्वी दत्ता हे झोपेतून जागे झाले असता त्यांची काळ्या रंगाची ट्रॉली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले. नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
मंगला एक्स्प्रेसच्या बोगीमध्ये चोरी
By admin | Updated: September 1, 2015 23:10 IST