लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शालिमार ते शिवाजीनगर असा रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी पन्नास हजार रुपयांचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़७) दुपारच्या सुमारास घडली़शिवाजीनगर मराठी शाळेजवळील कुलस्वामिनी रो-हाऊसमधील रहिवासी लताबाई दशरथ आहिरे या रविवारी दुपारी कामानिमित्त शहरात आल्या होत्या़ त्यांचे काम आटोपल्यानंतर दुचारी चार वाजेच्या सुमारास शालिमार येथून शिवाजीनगर ला रिक्षाने जात असता या प्रवासादरम्यान चॉकलेटी रंगाची साडी परिधान केलेल्या महिलेने त्यांच्या पिशवीतील पर्समधून दोन हजार रुपयाची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिक्षा प्रवासात दागिन्यांची चोरी
By admin | Updated: May 9, 2017 16:51 IST