ओझर टाउनशीप : मुंबई-आग्रा महामार्गावर ओझर येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणाहून १५ हजार रुपये किमतीच्या सेंटरिंग प्लेट्स चोरट्याने चोरून नेल्या. रविवारी पहाटेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर गडाख कॉर्नरजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या सेंटरींग प्लेट्सपैकी सहा प्लेट्स(किंमत १५ हजार रु पये) चोरट्याने चोरून नेल्याची तक्र ार आशुतोष तिवारी यांनी ओझर पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार के. डी. यादव करीत आहेत.
ओझरला सेंटरिंग प्लेट्सची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 01:15 IST