चांदवड : तालुक्यातील दुगाव येथील टेलिफोन उपकार्यालयाच्या भिंतीलगत ठेवलेल्या दोन बॅटऱ्यांमधील ५० हजार रुपये किमतीचे १११ सेल चोरीला गेले आहेत. बीएसएनएलच्या अमरराजा कंपनीचे २०० अॅम्पीयर / आवर दोन सेट मधील ४८ सेल व रिलायन्स जीओ कंपनीचे एचबीएल कंपनीचा २०० अॅम्पीयर / आवर एक सेटमधील १५ सेल असे एकूण ६३ सेल (किंमत रुपये पन्नास हजार )अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद टेलिफोन कार्यालयातील अधिकारी रुकसार अनिस पटेल यांनी चांदवड पोलीस ठाण्याला दिली आहे.
दुगाव टेलिफोन कार्यालयातून बॅटऱ्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 00:31 IST