शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडीचा पाणीप्रश्न गढूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 23:08 IST

इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका हा पावसाचा तालुका म्हणून परिचित असला तरी खैरेवाडी या आदिवासी वस्तीतील नागरिकांचा पाणीप्रश्न अतिशय गंभीर असून १०-२० कुटुंबे असलेल्या या गावातील लोकांना अत्यंत दर्जाहीन गढूळ पाणी प्यावे लागत आहे. इगतपुरीपासून १० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अतिदुर्गम खैरेवाडी येथील हे भयानक वास्तव आहे.

ठळक मुद्देप्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष ग्रामस्थांच्या जीवावर बेतणारे

इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका हा पावसाचा तालुका म्हणून परिचित असला तरी खैरेवाडी या आदिवासी वस्तीतील नागरिकांचा पाणीप्रश्न अतिशय गंभीर असून १०-२० कुटुंबे असलेल्या या गावातील लोकांना अत्यंत दर्जाहीन गढूळ पाणी प्यावे लागत आहे.इगतपुरीपासून १० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अतिदुर्गम खैरेवाडी येथील हे भयानक वास्तव आहे.जनावरेसुद्धा आपले तोंड पाण्याला लावत नसून तहानलेले राहणे पसंत करीत असल्याचे दिसून आले आहे. या आदिवासी वस्तीवरील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून ३ ते ४ किलोमीटर जंगलातून पायी जावे लागते. एका आटलेल्या विहिरीत जीवावर उदार होऊन खाली उतरून गाळमिश्रित पाणी आणावे लागत आहे.जिवंतपणी नरकयातना सोसणाऱ्या या आदिवासी नागरिकांकडून तालुक्यातील लोकप्रतिनिधीचा तसेच शासनाचा जळजळीत निषेध व्यक्त होत आहे. हा त्रास असह्य झाल्याने लोकप्रतिनिधीना या पाड्यावर पाणी प्यायला यायचे निमंत्रण आदिवासी नागरिकांनी दिले आहे.या दुर्लक्षित पाड्यावर सरकारची मदत पोहोचेल का? कारण मागील महिन्यात येथून ५ किमी अंतर असलेल्या बिवलवाडी येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन तेथील आदिवासी बांधवांचा पिण्याचा प्रश्न मार्गी लावला. आमचाही पाण्यासाठी संघर्ष थांबेल का, हा प्रश्न येथील संतप्त नागरिक करत आहेत.

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीwater shortageपाणीकपात