शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्जमाफिया ललित पाटीलसह तिघांचा नाशिकचा मुक्काम संपला; ऑर्थररोड कारागृहात होणार रवानगी

By अझहर शेख | Updated: December 18, 2023 16:46 IST

नाशिक : पुण्याच्या ससून रुग्णालयातून संपूर्ण देशभरात एमडी ड्रग्जचे रॅकेट चालविणारा व या रुग्णालयातून फरार झालेला बहुचर्चित ड्रग्जमाफिया संशयित ...

नाशिक : पुण्याच्या ससून रुग्णालयातून संपूर्ण देशभरात एमडी ड्रग्जचे रॅकेट चालविणारा व या रुग्णालयातून फरार झालेला बहुचर्चित ड्रग्जमाफिया संशयित ललित पाटीलसह तीन संशयितांचा दहा दिवसांचा नाशिकचा पोलीस कोठडीतील मुक्काम संपला. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे आता पुन्हा मुंबईच्या ऑर्थररोड कारागृहात त्यांची रवानगी केली जाणार आहे.

एमडी ड्रग्ज व ससून प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभरात मागील काही महिन्यांपासून चर्चेत आलेला संशयित ललित पाटीलसह त्याचे साथीदार संशयित रोहित चौधरी, जिशान शेख, हरिशपंत या तिघांचा ताबा नाशिकच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या शुक्रवारी घेतला होता. त्यांना चोख बंदोबस्तात शनिवारी (दि. ९) पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयापुढे हजर केले होते. न्यायालयाने या चौघांना थेट १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी (दि.१८) पोलीस कोठडी संपल्याने त्यांना दुपारी पुन्हा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायाधीश यु.जी.मोरे यांच्या न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत चौघांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली. सरकारपक्षाकडून न्यायालयाला न्यायालयीन कोठडीचा रिपोर्ट सादर करण्यात आला होता. यामुळे आता या चौघांना मुंबई पोलिसांच्या हवाली केले जाणार असून त्यांची ऑर्थररोड कारागृहात रवानगी केली जाणार आहे.

टॅग्स :Lalit Patilललित पाटील