शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’ महामार्गावर सायकली सुस्साट...; ३२ राज्यांतील १ हजार स्पर्धकांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 08:01 IST

आंतरराष्ट्रीय सायकलपटू ठरले आकर्षण  

शैलेश कर्पे

सिन्नर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती मार्गावर रविवारी सायकल स्पर्धांचा थरार पाहायला मिळाला. देशातील ३२ राज्यांतील १ हजाराहून अधिक स्पर्धक या सायकल स्पर्धेत सहभागी झाले आहेत. वेगाशी स्पर्धा करणाऱ्या महागड्या सायकली समृद्धी महामार्गाच्या सिमेंटच्या गुळगुळीत रस्त्यावर सुसाट वेगाने धावताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. 

सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने २७ व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेला शनिवारी सकाळी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी हरीश बैजल व माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतीनी कोकाटे यांच्या हस्ते प्रारंभ झाला.  महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, गोव्यासह ३२ राज्यांतील ५०० मुली व ५०० मुले, असे १ हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत. 

आंतरराष्ट्रीय सायकलपटू ठरले आकर्षण  

सिन्नर तालुक्यातील पाथरेपासून सोनारीपर्यंत ५० किलोमीटर अंतराचा मार्ग पूर्ण झालेला आहे. त्यामुळे या मार्गावर राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा ७ ते १० जानेवारीदरम्यान होत आहेत. यात पूजा धनावळे, मयुरी लुटे, विवान सप्रू यांच्यासारख्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या स्पर्धकांचा सहभाग आहे. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गCyclingसायकलिंग