शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

हुक्का पार्टीत देशभरातील व्यापारी-उद्योजकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 22:46 IST

गणेश घाटकर, लोकमत न्यूज नेटवर्क इगतपुरी : तालुक्यातील त्रिंगलवाडीत माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये ग्रामीण पोलिसांनी हुक्का पार्टीवर टाकलेल्या छाप्यानंतर त्यातील अनेक किस्से समोर येऊ लागले आहेत. रेवती हार्ड वेअर स्पेअर पार्ट कंपनीला चांगला नफा झाल्याने शनिवार व रविवारी दोन दिवस देशभरातील काही व्यापारी व उद्योजकांना या पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यात काही आंबट शौकिनांनी मुंबईहून देहविक्रीसाठी महिलांना बोलावून घेतल्याचेही उघड झाले आहे. पोलिसांनी मात्र ही पार्टी उधळून लावल्याने त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले.

ठळक मुद्देकंपनीला नफा झाल्याने ठेवली होती पार्टी : आंबटशौकिनांनी केला घात

गणेश घाटकर,लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : तालुक्यातील त्रिंगलवाडीत माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये ग्रामीण पोलिसांनी हुक्का पार्टीवर टाकलेल्या छाप्यानंतर त्यातील अनेक किस्से समोर येऊ लागले आहेत. रेवती हार्ड वेअर स्पेअर पार्ट कंपनीला चांगला नफा झाल्याने शनिवार व रविवारी दोन दिवस देशभरातील काही व्यापारी व उद्योजकांना या पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यात काही आंबट शौकिनांनी मुंबईहून देहविक्रीसाठी महिलांना बोलावून घेतल्याचेही उघड झाले आहे. पोलिसांनी मात्र ही पार्टी उधळून लावल्याने त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले.मुंबई, पुणे, नागपूरसह महाराष्ट्रातून व देशाच्या विविध भागातून इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक वीकेंड साजरा करण्यासाठी येत असतात. निसर्गाचे लाभलेले वरदान आणि सोयीसुविधांनी सज्ज असलेले रिसॉर्ट व हॉॅटेल्स यामुळे याठिकाणी पर्यटकांचा नेहमीच राबता असतो. त्यातच धनिकांकडून याठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. काही पार्ट्यांमध्ये खुलेआम अमली पदार्थांचा वापर होत असल्याने इगतपुरी तालुका त्यामुळे बदनाम झाला आहे. त्याचा परिणाम पर्यटकांवर होत आहे. शनिवारी मध्यरात्री इगतपुरी येथील त्रिंगलवाडीमधील पारदेवी शिवारात माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये एका बड्या उद्योजकाने त्याच्या रेवती हार्डवेअर स्पेअर पार्ट कंपनीला चांगला नफा झाल्याने सलग शनिवार व रविवार असे दोन दिवस पार्टीसाठी त्याच्या डिस्ट्युब्यूटर्ससह काही व्यापाऱ्यांना निमंत्रित केले होते. परंतु, त्यातील काही आंबटशौकिनांनी देह विक्री करणाऱ्या महिलांना बोलावून घेतल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी ५२ लोकांना ताब्यात घेतले त्यात अनेक उद्योजक-व्यापारी असल्याचे समजते. दुसऱ्या दिवशीही काही उद्योजक या पार्टीत सामील होणार होते. परंतु त्याआधीच पोलिसांनी छापा टाकत पार्टी उधळून लावली.खुशीऐवजी, बदनामी नशिबी आलीकंपनीला चांगला नफा झाल्याने कंपनी मालकाने या पार्टीचे आयोजन केले होते. त्यासाठी माऊंटन शॅडो रिसॉर्ट दोन दिवसांसाठी आरक्षित करण्यात आले होते. या पार्टीमध्ये देशभरातील कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ या प्रांतातील व्यापारीही सहभागी झाले होते. आपल्या व्यापाऱ्यांना खूष ठेवण्यासाठी ही पार्टी ठरवली गेली, परंतु पोलीसांच्या कारवाईने पार्टी उधळली जाऊन व्यापारी मंडळीच्या नशिबी बदनामी आली.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी